पंचतारांकित हॉटेल्समधील दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

नागपूर  :  करोना महामारीच्या उद्रेकात सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना या आजारावरील  उपचाराच्या नावाखाली शिक्षण सम्राट, हॉटेल व्यावसायिकांनी ठिकठिकाणी महागडे कोविड केंद्र सुरू के ले आहेत. लोकप्रतिनिधीही या केंद्राचे उद्घाटन करीत  असल्याने आश्चर्य व्यक्त के ले जात आहे.  विशेष म्हणजे, येथील  उपचार शुल्क गोरगरीबांना परवडणारे नसल्याने त्यांनी जावे कु ठे हा प्रश्न आहे.

करोना महामारीच्या उद्रेकात सर्वाधिक कोणी होरपळून निघत असेल तर तो मध्यमवर्गीय, तो बाधित झाला तर त्यांच्याकडे सरकारी रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. तेथे त्यांच्यासाठी खाटा उपलब्ध नाही, घरी उपचार करावा म्हटले तर जागा नाही, बाजारात औषध नाही. त्यामुळे त्याच्या उपचाराची सोय करणे हे खरे तर सरकार  तसेच लोकप्रतिनिधींची जबाबदारी ठरते. पण त्याच्या

नावाने अनेक जण आपले उखळ पांढरे करू लागल्याचे चित्र सध्या नागपुरात आहे. खाटा नसल्याने रुग्ण उपचाराअभावी मृत्यू पावतात असे चित्र निर्माण झाल्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकाच वेळी खाटा वाढवण्यासाठी सर्वांचीच मदत घ्यायला सुरुवात  केली.

या प्रयत्नातून खाटांची संख्या वाढून गरीब  लोकांना उपचार मिळावे हा हेतू साध्य होणे अपेक्षित होते, पण या क्षेत्रात दिसत असलेली नफे खोरी ओळखून तथाकिथत शिक्षण सम्राट, हॉटेल व्यावसायिक व अनेक जणांनी या क्षेत्रात शिरकाव के ला. अनेक हॉटेल्सनी कोविड के अर सेंटर सुरू के ले आहेत. अलीकडेच शहरातील एका मोठ्या शिक्षण संस्था समूहाने वर्धा मार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अशाप्रकारचे केंद्र सुरू  केले.

विशेष म्हणजे याच्या उद्घाटनाला मंत्री उपस्थित होते. केंद्राच्या नावात  केअर असले तरी तेथील  रुग्णसेवेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. येथे एका दिवसासाठीचे दर  १५ ते २५ हजार रुपये आहे. हे दर श्रीमंत आणि अतिश्रीमंतांनाच परवडणारे आहे. रेल्वे स्थानकाजवळही अशाच प्रकारे एका हॉटेलने कोविड के अर केंद्र सुरू के ले आहे. तेथे सामान्य वार्डसाठी प्रतिदिवस सात हजार रुपये, सेमी डिलक्स रुम्सचे दहा हजार आणि डिलक्स रुमचे १२ हजार प्रतिदिवस रुग्णांकडून घेतले जाणार आहे. व्हेंटिलेटरचे प्रतिदिवस तीन हजार आणि प्राणवायूसाठी प्रतिदिवस १५०० रुपये वेगळे आकारले जाणार आहे.  वर्धा मार्गावरही एका शिक्षण संस्थेचे कोविडालय आहे. तेथील दर आकारणीमुळे रुग्ण त्रस्त आहेत. या सर्व  ठिकाणचे दर फलक पाहिल्यावर तेथील सुविधा गरीबांसाठी नाही हेच स्पष्ट होते.

यासंदर्भातील माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य म्हणाले,   एका तीनशे फु टाच्या घरात पाच-सहा लोक राहतात.

तेथे करोना झाला तर त्यांनी कु ठे जावे. त्यांच्या व्यवस्थेसाठी खासदार निधीतून कोविड के अर सेंटरला पैसे का देण्यात आले नाही. झोपडपट्टीतील लोक तर घरीच मरत आहेत. ज्या लोकांना गरज नाही, जे अनेक खोल्यांच्या बंगल्यात राहतात. ज्यांना आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी उघडलेल्या सेंटरचे लोकप्रतिनिधींनी उद्घाटन करणे योग्य नाही. कार्पोरेट लोक तर कोविड सेंटरच्या नावाने व्यवसाय करत आहेत.