11 December 2017

News Flash

निष्काळजीपणाचे बळी..

बीटी कापसाचे ९० बाय १२० सेंटीवर एक रोपटे लावणे आवश्यक आहे.

राजेश्वर ठाकरे, नागपूर | Updated: October 3, 2017 4:31 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

पिकावरील किडींचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी फवारण्यात येत असलेल्या कीटकनाशकाने माणसे मरू लागली आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात कीटकनाशकाने मरणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व प्रकाराला विषारी कीटकनाशक वापरण्याबद्दलचे, हाताळण्याबद्दलचे अज्ञान, निष्काळजीपणा असल्याचे दिसून आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापसावर किडींचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाय योजनाचे पुस्तिका प्रकाशित केली आहे. संशोधन केंद्राने सूचवलेल्या कीटकनाशकांव्यतिरिक्त आणखी काही कंपन्यांची कीटकनाशके बाजारात आली आहेत. कीटकनाशक प्रमाणात वापरण्यात यावे. तसेच ते हाताळताना नाक, तोंडाला कापड बांधणे आवश्यक आहे. परंतु गरिबी, अज्ञान यामुळे हे केवळ पुस्तकात किंवा औषध कंपन्यांनी दिलेल्या पुस्तिकेपर्यंत मर्यादित राहते.

बीटी कापसाचे ९० बाय १२० सेंटीवर एक रोपटे लावणे आवश्यक आहे. परंतु शेतकरी ९० बाय ६० सेंटीमीटर रोपटे लावतो. त्यामुळे झाडाची उंची वाढते. उंच असलेल्या कापसच्या कापसाच्या झाडावर कीटनाशक फवारणी करताना फवारणी करणाऱ्यांचा नाका-तोपर्यंत ते जाते. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे, असेही कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर म्हणाले.

कीटकनाशक वापरण्याचे प्रमाण जरी निश्चित असलेतरी शेतकरी, शेतमजूर ते पाळतात असे नाही. कीटकनाशक प्रमाणात वापरण्याचे शिक्षण, जनजागृती झालेली नसते. कृषी विभागाचे लोक शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. मूळात कीटकनाशक वापरण्याचे नियमित प्रशिक्षण देणारी, त्यासाठी जागृती निर्माण यंत्रणाच नाही. त्याचा परिणाम शेतकरी कीटकनाशक विक्रेत्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहतात. मग विक्रेता अंदाजाने वापरण्यास सांगतो. त्यामुळे कीटकनाशकाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

  • संसोधन केंद्राने कापसावर येणाऱ्या किडीचे प्रकार आणि त्यावरील उपाय सूचवले आहेत. त्यानुसार पेरणीनंतर ६० ते ९० दिवसांपर्यंत बोंडअळी आल्यास फेम (फ्लूॅबेनडायमॉइड ४८० एससी) ०.२५ मिली./लिटर किंवा अवांट (इण्डोक्साकार्ब १४.५ एससी) ०.५ मि.ली./लिटर किंवा स्पिनसोटर (स्पिनोसॅड ४५ टक्के एससी) ०.२५ मिली/लिटर पाण्यात आवश्यकतेनुसार फवारणी करणे आवश्यक आहे.
  • याच कालावधीत गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्यास कामगंध सापळे ५० मिटर अंतरावर/ हेक्टरी ५ या प्रमाणात लावावेत. गुलाबी बोंडअळी आणि पिठय़ा ढेकूनचा प्रादुर्भाव झाल्यास लॉरवीन (थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी) ४ ग्रॅम/ लिटर किंवा क्विनोलफॉस २५ ईसी ४ मि.लि./लिटर किंवा क्लोरपायरीफॉस २० ईसी २.५ मिलि/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पांढरी माशीवर पोलो (डॉयपेन्थी युरॉन ५० डब्ल्यूपी) १.२ ग्रॅम/ लिटर पाण्यात फवारणी करावी. पेरणीनतर १२० दिवसांपर्यंत गुलाबी बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून आल्यास फेनव्हलरेट २० टक्के ईसी ०.८ मिलि/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे.

First Published on October 3, 2017 4:31 am

Web Title: pest issue on crop farmers suicide