X

निष्काळजीपणाचे बळी..

बीटी कापसाचे ९० बाय १२० सेंटीवर एक रोपटे लावणे आवश्यक आहे.

पिकावरील किडींचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी फवारण्यात येत असलेल्या कीटकनाशकाने माणसे मरू लागली आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात कीटकनाशकाने मरणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व प्रकाराला विषारी कीटकनाशक वापरण्याबद्दलचे, हाताळण्याबद्दलचे अज्ञान, निष्काळजीपणा असल्याचे दिसून आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापसावर किडींचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाय योजनाचे पुस्तिका प्रकाशित केली आहे. संशोधन केंद्राने सूचवलेल्या कीटकनाशकांव्यतिरिक्त आणखी काही कंपन्यांची कीटकनाशके बाजारात आली आहेत. कीटकनाशक प्रमाणात वापरण्यात यावे. तसेच ते हाताळताना नाक, तोंडाला कापड बांधणे आवश्यक आहे. परंतु गरिबी, अज्ञान यामुळे हे केवळ पुस्तकात किंवा औषध कंपन्यांनी दिलेल्या पुस्तिकेपर्यंत मर्यादित राहते.

बीटी कापसाचे ९० बाय १२० सेंटीवर एक रोपटे लावणे आवश्यक आहे. परंतु शेतकरी ९० बाय ६० सेंटीमीटर रोपटे लावतो. त्यामुळे झाडाची उंची वाढते. उंच असलेल्या कापसच्या कापसाच्या झाडावर कीटनाशक फवारणी करताना फवारणी करणाऱ्यांचा नाका-तोपर्यंत ते जाते. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे, असेही कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर म्हणाले.

कीटकनाशक वापरण्याचे प्रमाण जरी निश्चित असलेतरी शेतकरी, शेतमजूर ते पाळतात असे नाही. कीटकनाशक प्रमाणात वापरण्याचे शिक्षण, जनजागृती झालेली नसते. कृषी विभागाचे लोक शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. मूळात कीटकनाशक वापरण्याचे नियमित प्रशिक्षण देणारी, त्यासाठी जागृती निर्माण यंत्रणाच नाही. त्याचा परिणाम शेतकरी कीटकनाशक विक्रेत्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहतात. मग विक्रेता अंदाजाने वापरण्यास सांगतो. त्यामुळे कीटकनाशकाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain