News Flash

नियोजन व व्यवस्थापनामुळे पाणी टंचाईवर मात शक्य

ज्ञानाचे आणि कचऱ्याचे संपत्तीत रुपांतर करणे ही आता देशाची गरज आहे.

नियोजन व व्यवस्थापनामुळे पाणी टंचाईवर मात शक्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर : पाणी वाचवा, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर देशात पाणीटंचाई जाणवणार नाही. पाणी आणि  पर्यावरण शुद्ध राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी एका आभासी कार्यRमाच्या माध्यमातून गडकरी यांनी संवाद साधला. ज्ञानाचे आणि कचऱ्याचे संपत्तीत रुपांतर करणे ही आता देशाची गरज आहे. काहीच कचरा नसतो, त्याचा कुठे ना कुठे उपयोग होत असतो. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाची गरज आहे. गावातले पाणी गावात, शेतातले शेतात आणि घरातले पाणी घरातच राहिले तर पाण्याची पातळी वाढेल आणि पाणीटंचाईपासून सुटका होईल. कृषी क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर झाला तर पाणी वापरात बचत होईल. नवीन संशोधन, तंत्रज्ञानामुळे उत्पादनात कोणताही समझोता न करता खर्चात बचत करणे शक्य झाले आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी ही देशाची गरज आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी निर्माण केला. या सीएनजीवर नागपुरात महापालिकेच्या बसेस धावत असल्याचेही गडकरी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 12:10 am

Web Title: planning management can overcome water scarcity ssh 93
Next Stories
1 नागपुरातील निर्बंध शिथिल करा!
2 सलग दुसऱ्या दिवशी व्यापारी रस्त्यावर
3 जिल्ह्य़ात डेंग्यूची साथ तीव्र
Just Now!
X