22 September 2020

News Flash

सुरक्षा रक्षकाकडून सहा वर्षीय मुलीवर अत्याचार

सुरक्षा रक्षकाने सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली

प्रतिनिधिक छायाचित्र

कामठी कन्टॉनमेंट परिसरातील घटना

कामठी येथील लष्करी छावणी परिसरात एका सुरक्षा रक्षकाने सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणात पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. विलास रामचंद्र वाहुरकर (५०) रा. येरखेडा असे आरोपीचे नाव आहे.

कामठी येथील कन्टॉनमेंटमध्ये छावणी नगर परिषदेचे कार्यालय आहे. त्या कार्यालयांतर्गत पीडित मुलीचे वडील कार्यरत असून छावणी परिसरातच राहतात, तर आरोपी हा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे. त्यांचा लष्कराशी कोणताही संबंध नाही. छावणी परिसरात नागरी सेवा देणाऱ्या नगरपरिषदेचे ते कर्मचारी आहेत.

काल, रविवारी दुपारी ३.३० वाजता पीडित ६ वर्षीय मुलगी अंगणात खेळत असताना आरोपीने तिला बाजूला उभ्या असलेल्या कारमध्ये बोलावले व तेथे तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर पीडित मुलीने ही माहिती आपल्या आईला दिली. तिच्या आईने आपल्या पतीला सांगितले व जुनी कामठी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भटकर यांच्या मार्गदर्शनात हवालदार गजभिये यांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 4:33 am

Web Title: police arrested security guard for molesting six year old girl in nagpur
Next Stories
1 राज्य सरकारच क्षमतेनुसार काम करू देत नसल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप
2 मुलीसोबत सेल्फी काढण्यासाठी बारमध्ये गोळीबार
3 निविदा काढण्यात गडकरी यांचा हातखंडा
Just Now!
X