पोलीस आयुक्तांकडून २० लाखांची मागणी

नागपूर : करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू के ली आहे. या काळात लोकांना सुरक्षा पुरवणे आणि रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून विशेष साहित्याची आवश्यकता आहे. ते खरेदी करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकु मार उपाध्याय यांनी विभागीय आयुक्तांकडे २० लाख रुपयांची मागणी के ली आहे.

उपराजधानीतील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मेयोतून चार संशयित रुग्ण पळून गेले होते. त्यांना शोधण्यासाठी डॉक्टरांनी पोलिसांची मदत मागितली होती. पण, पोलिसांना सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अशा रुग्णांना पकडल्यास पोलिसांनाही संसर्ग होऊ शकतो. यामुळे पोलिसांवर स्वत:चा बचाव करून नागरी सुरक्षा करण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत हॅण्ड सॅनिटायझर, तोंडावर बांधण्यासाठी मास्क व आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी निधीची गरज आहे.  राज्य सरकारने विभागीय आयुक्तांना ५ कोटी रुपये दिले असून त्यातून पोलिसांकरिता २० लाख रुपये मिळावे, अशी विनंती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकु मार उपाध्याय यांनी के ली.

कौटुंबिक कार्यक्र मांना जमावबंदी लागू नाही

करोनाच्या दहशतीमुळे शहर पोलिसांनी जमावबंदी लागू के ली आहे. यामुळे शहरातील सभा, धार्मिक कार्यक्र म, आंदोलन, मोर्चे आणि राजकीय कार्यक्र मांना परवानगी नाकारण्यात आली. दुसरीकडे बेकायदा एकत्र येणाऱ्या पाचपेक्षा अधिक लोकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पण, लग्न समारंभ, बारसे, मुंज, साक्षगंध आणि अंत्यसंस्कार आदी कौटुंबिक कार्यक्र मांना जमावबंदी अद्याप लागू करण्यात आलेली नाही.

करोना रुग्ण पळून जाऊ नये म्हणून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पळून जाणाऱ्या रुग्णांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येते. डॉक्टर, पोलिसांनाही खबरदारी घ्यावी. कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा किट पुरवण्यात याव्यात. पोलीस ठाण्यांसह बंदोबस्तातील पोलिसांना साहित्याचा पुरवठा करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे २० लाख रुपयांची मागणी केली आहे.

– डॉ. भूषणकु मार उपाध्याय, पोलीस आयुक्त.