अर्जुनी मोरगाव पोलिसांकडून कठोर वागणूक

नागपूर : घरात घुसून एका महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्याविरुद्ध महिलेची तक्रोर नोंदवण्यास अर्जुनी मोरगाव पोलिसांनी नकार दिला असून रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवून महिलेला तक्रोरीसाठी अधिक प्रयत्न के ल्यास उलट कारवाई करण्याची धमकी दिली. पोलिसांच्या या उर्मटपणामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस खालावत आहे.

अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचा बदला घेण्यासाठी एक तरुण दुसऱ्या तरुणाच्या घरात घुसला. त्यावेळी त्यांच्या घरात के वळ एकटी महिला होती. त्यावेळी आरोपीने महिलेशी असभ्य वर्तन के ले. यानंतर महिला पोलीस ठाण्यात तक्रोर देण्याकरिता पोहोचली. पण, अर्जुनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी तक्रोर स्वीकारण्यास नकार दिला. महिला बराच वेळ पोलीस ठाण्यात बसून होती. पण, आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी तक्रोरदार महिलेलाच तुरुंगात डांबण्याची धमकी दिली. यासंदर्भात तोदले यांच्याशी संपर्क के ला असता ठाणेदार मी असून या ठिकाणी काय करायचे, याचा निर्णय माझा आहे, असे सांगितले. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांना प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तोदले यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पण, अधीक्षकांच्या आदेशाला न जुमानता तोदले यांनी महिलेला परत पाठवले. आरोपींना वाचवण्यासाठीच हा त्यांचा खटाटोप सुरू होता. विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पीडित महिलेने लोकसत्ताशी बोलताना के ली.

गुन्हा दाखल करण्याचे आदेश

यासंदर्भात पोलीस निरीक्षकांना संबंधित महिलेची तक्रोर नोंदवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. महिला पोलीस ठाण्यातून निघून गेली असल्यास पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तक्रोर घ्यावी व योग्य ती कारवाई करावी. यावर कारवाई न झाल्यास पोलीस निरीक्षकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

– मंगेश शिंदे, पोलीस अधीक्षक, गोंदिया.