22 January 2021

News Flash

हौशी संस्थांमुळे पोलिसांवर अन्नवाटपाचा अतिरिक्त ताण

छायाचित्र काढण्यासाठी औटघटकेची समाजसेवा 

छायाचित्र काढण्यासाठी औटघटकेची समाजसेवा 

नागपूर : करोनामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येऊन काम करीत आहेत. पण, काही हौशी स्वयंसेवक एक ते दोन दिवसांकरिता समाजसेवेचे सोंग आणून अन्न वितरण करतात. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून लोक परिसरात अन्नासाठी गर्दी करीत असून त्यांच्यासाठी अन्नाची तजवीज करण्याचा अतिरिक्त ताण बंदोबस्तावरील पोलिसांवर पडत आहे.

शहरात १८ मार्चपासून शहरात संचारबंदी तर २१ मार्चपासून देशात टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे अनेक कामगार, मजूर आहे त्याच ठिकाणी अडकले. त्यांच्याकडे धान्य व पैसेही नाही. कंपन्यांचे संचालक व कंत्राटदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या महिनाभरापासून गरीब व गरजू लोकांना दोन वेळच्या अन्नाची चणचण भासत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला व लोकांना अन्नपदार्थाचे पाकीट व धान्य वाटपाचे उपक्रम हाती घेतले. याद्वारे काही संस्था अतिशय चांगले कार्य करीत आहेत. पण, काही हौशी संस्था एक ते दोन दिवस विशिष्ट ठिकाणी अन्नवाटप करतात. त्याचे छायाचित्र काढून ते प्रसारित झाल्यानंतर अन्नदान बंद करतात. पण, गरजवंतांना संस्थेचे नाव माहीत नसते व ज्या ठिकाणी अन्न वाटप होते, तेथे ते गर्दी करतात. हौशी संस्थांकडून अन्नाचे वाटप बंद झाल्यानंतर झालेल्या गर्दीला समजावण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागते. पर्यायी त्यांच्यासाठी अन्नाची सुविधा करून देण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था व दानशूरांना भ्रमणध्वनी करून मदत मागावी लागते. रस्त्यावर नियमित बंदोबस्त सांभाळणाऱ्या पोलिसांना व अधिकाऱ्यांना या नवीन जबाबदारीचा अतिरिक्त ताण येतो. पण, पोलीस त्यालाही सामोरे जाऊन समाजासाठी कार्य करीत असल्याची बाब गेल्या १९ दिवसांतील अन्नवाटपाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या १९ दिवसांत पोलिसांनी विविध संस्थांच्या मदतीने १०लाख १८ हजार ७८३ अन्नाचे पाकिट वितरित करण्यात आले.

या लोकांना अन्नाची गरज

संचारबंदीमुळे ट्रकचालक, दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी, कामगार महिला, निवारागृहातील नागरिक, विधवा व निराधार महिला, पदपथावरील भिकारी आदींना पोलिसांकडून इतर संस्थांच्या मदतीने अन्नाचा पुरवठा केला आहे. अडचणीतील लोकांनी १०० क्रमांकावर मदत मागितल्यानंतर विविध संस्थांशी समन्वय साधून त्यांना अन्न, धान्य, निर्जंतुकीकरण साहित्य आदींचा पुरवठा केला जातो.  यात पोलिसांना १२६ स्वयंसेवी संस्थांची मदत होत आहे.

– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 3:32 am

Web Title: police face extra stress of food sharing by ngo zws 70
Next Stories
1 अंध विद्यालयातील मुलगी अखेर घरी पोहोचली..
2 बेघरांच्या निवारा केंद्रात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
3 कंत्राटी पदे भरतानाही होमिओपॅथी तज्ज्ञांना डावलले!
Just Now!
X