News Flash

चहा ठेला बंद करण्यास गेलेल्या पोलिसांना मारहाण

सदर पोलीस ठाण्यात चहा ठेला चालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर : जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशानुसार चहा ठेला बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकावर हल्ला करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात चहा ठेला चालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दिनेश बाबुलाल यादव (३०) रा. नटराज सोसायटी, गोरेवाडा असे आरोपीचे नाव आहे. त्याचा तेलंगखेडी हनुमान मंदिराजवळ पानठेला आहे.

जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षांनी करोना आजाराच्या पार्श्वभूमीवरील शहरातील पान ठेला, चहा ठेला, रेस्टॉरेंट, चायनीज सेंटर, बार, पब, क्लब आदी आस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावली पोलिसांकडून करण्यात येत आहे. बुधवारी दुपारी सदर पोलीस ठाण्याचे पथक तेलंगखेडी परिसरात चहा, पान ठेले, चायनीज सेंटर व रस्त्यावरील दुकाने बंद करण्यासाठी गेले असता आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांशी भांडण केले.

त्यानंतर शिवीगाळ करून उपनिरीक्षक एस. नागरगोजे यांना मारहाण के ली.  याप्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल के ला. आरोपीचा भाऊ पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 2:27 am

Web Title: police fighting tea shop thela crime akp 94
Next Stories
1 लोकजागर : नेत्यांच्या इच्छाशक्तीला ‘करोना’! 
2 करोनाचे नवीन ११ संशयित दाखल
3 दोन दिवसांत करोनाचा एकही नवीन रुग्ण नाही
Just Now!
X