22 January 2021

News Flash

गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची डोक्यात गोळी घालून आत्महत्या

पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत

प्रतिकात्मक छायाचित्र

रवींद्र जुनारकर

गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मूलचेरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ यांच्या पत्नी संगीता धनराज शिरसाठ यांनी गुरूवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात नक्षलविरोधी अभियान राबवणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी अशाच पद्धतीने आत्महत्या केल्यानंतर आता पोलीस अधिकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याने तणावाची स्थिती आहे.

अहेरी पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मूलचेरा पोलीस ठाण्यात धनराज शिरसाठ उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाट हे नक्षलविरोधी अभियान राबवून गुरूवारी मूलचेरा येथे परतले होते. त्यानंतर आई-वडिलांसह मौजा मूलचेरा येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी पत्नी आणि दोन्ही मुले घरीच होती. सुमारे १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान पत्नी संगीता शिरसाट यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडली.

आईने गोळी झाडल्याचं पाहून मुलीने आरडाओरड केली. यानंतर पोलीस मदत केंद्र येथे तैनात असणारे कर्मचारी व अधिकारी हे घटनास्थळी गेले असता संगीता जखमी अवस्थेत होत्या. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखळ करण्यात असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 5:38 pm

Web Title: police officer wife commit suicide in gadchiroli sgy 87
Next Stories
1 कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन, किराणामाल अन् कुटुंबाचा खर्चही!
2 लोकजागर : ताटी उघडा ‘प्रशासना’!
3 Coronavirus : रामेश्वरी, पार्वतीनगर हादरले!
Just Now!
X