नागपुरात पथदर्शी प्रकल्प

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमीमधून (एमपीए) प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर पोलीस अधिकारी पुन्हा कधी प्रशिक्षण घेण्यासाठी अ‍ॅकॅडमीत जात नाहीत. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान मिळालेले ज्ञान अधिकारी विसरतात आणि पोलीस दलात प्रत्यक्षात काम करताना अनुभवातून शिकत जातात. परंतु अनेकदा पोलीस अधिकारी गुन्ह्य़ांचा तपास करताना चुकत असल्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर पोलिसांना निरंतर प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याची चर्चा सुरू झाली. यातून अधिकाऱ्यांचे दैनंदिन काम विस्कळीत न होता त्यांना प्रशिक्षण देता यावे म्हणून ‘ई-अ‍ॅकॅडमी’ची संकल्पना अस्तित्वात आली. या अ‍ॅकॅडमीला नागपूरपासून प्रारंभ झाला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालय आणि नागपूर परिक्षेत्रातून ‘ई-अ‍ॅकॅडमीद्वारा ई-लर्निग’ या पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात झाली आहे.

शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम हे प्रशिक्षण विभागाचे संचालक असताना त्यांनी ‘ई-अकॅडमी’चा हा ऑनलाईन प्रकल्पाची संकल्पना मांडली. त्यादृष्टीने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. ई-लर्निगमध्ये काय असावे, यावर  जवळपास दोन ते तीन वष्रे अभ्यास करण्यात आला. आज पोलीस अधिकाऱ्यांसाठी हा ई-प्रशिक्षण प्रकल्प तयार आहे. या प्रकल्पात प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मोबाईलवर कधीही आणि कुठेही प्रशिक्षण घेता येईल. यात विविध प्रकरणे तयार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने विविध कायदे, गुन्ह्य़ांचा तपास कसा करावा, पंचनामा कसा लिहावा, न्यायालयात गुन्हासिद्धीसाठी आवश्यक असणारे   पुरावे, गुन्हेसिद्धीसाठी दस्तावेज तयार करण्याची पद्धत, न्यायालयातील विविध खटल्यांचे निकाल, विविध अधिसूचना, निर्णय आदी संदर्भात ऑनलाईन माहिती उपलब्ध असेल.

प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांच्या नावानुसार ‘लॉग इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ देण्यात येईल. त्यानंतर पोलीस अधिकारी विविध अभ्यासक्रमांचा फावल्या वेळात वाचन करून प्रशिक्षण घेऊ शकतील. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण ऐच्छिक नसून प्रत्येक अधिकाऱ्याला महिन्यातील काही तास प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.

एकदा अधिकाऱ्यांची ‘लॉग इन आयडी’ तयार झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने वाचनासाठी किती वेळ दिला, किती व कोणत्या प्रकरणांचा अभ्यास केला आदींवर एमपीएच्या आयटी विभागाचे लक्ष असेल. एखाद्या अधिकाऱ्याने अनेक दिवसांपासून प्रशिक्षण घेतले नाही किंवा वाचन केले नाही, तर एमपीएच्या आयटी विभागाकडून ताबडतोब संबंधितांना एसमएस, ई-मेलद्वारे संदेश पाठवून प्रशिक्षण घेण्याची माहिती देण्यात येईल. त्यामुळे पोलीस अधिकारी अद्ययावत राहतील आणि गुन्ह्य़ांचा तपास करताना मदत होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकल्प राज्यभर राबविण्याचा विचार

हा प्रकल्प नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आला. आता हा ऑनलाईन प्रकल्प तयार असून नुकतीच त्यासंदर्भात नागपुरात एक बैठक झाली आणि नागपूर पोलीस आयुक्तालय आणि परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना ‘लॉग इन आयडी’ उपलब्ध करून देण्यात आले. नागपुरात सध्या प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर आहे. नागपूरनंतर नाशिक आणि औरंगाबाद येथे हा प्रकल्प सुरू करण्यात येईल. मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नागपुरात हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेही तपास करतात म्हणून त्यांच्यासाठीही अकाऊंट उघडून देण्यात येतील. पोलीस ठाण्यात किंवा इतरत्र बसले असताना अधिकारी व कर्मचारी आपले प्रशिक्षण पूर्ण करू शकतात.

– नवल बजाज, विशेष पोलीस महानिरीक्षक व संचालक (प्रशिक्षण)

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा

pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय

High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश