News Flash

नेत्याचे फलक लावण्याच्या वादातून एकाचा खून

राजकीय पुढाऱ्याचे फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले.

प्रतिकात्मक छायाचित्र

राजकीय पुढाऱ्याचे फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. ही थरारक घटना रविवारी मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास उदयनगर परिसरात घडली. यामुळे विधानसभा निवडणुकीनंतरही दक्षिण नागपुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

जितेंद्र वासुदेवराव बडे (२९) रा. संजय गांधीनगर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद दशरथ रोकडे (२५) रा. दुबेनगर व इतरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र हा संजीवनी रुग्णालयातील शल्यक्रियागृहात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. तो अविवाहित असून आई-वडील आणि लहान भावासह राहत होता. पूर्वी तो भाजप युवा मोर्चाच्या महत्त्वाच्या पदावर होता. गेल्या निवडणुकीत त्याने पक्षाचे चांगले कामही केले होते. मात्र, गटाअंतर्गत विरोध असल्यामुळे काहीं जणांमध्ये त्याच्याविषयी गैरसमज झाला होता. त्यामुळे त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला. आरोपी प्रसाद रोकडे आणि त्याच्या सहा साथीदारांनी जितेंद्रवर लक्ष ठेवले. रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास जितू हा मित्र रितीक धनराज डेंगे (२०) रा. भोलेबाबा नगर आणि अभिजित खरात यांच्यासोबत उदयनगर चौकात पानठेल्यावर उभा होता. तेव्हा जितेंद्रने उदयनगर चौकात लागलेले एका राजकीय नेत्याचे पोस्टर फाडले व शिवीगाळ केली. आरोपी प्रसाद रोकडे याला माहिती मिळताच तीन दुचाकींवर सात जण उदयनगर चौकात आले. त्यांनी जितेंद्रला पकडले आणि भरचौकात आणले. त्याच्यावर चाकू आणि तलवारीने सपासप वार केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी प्रसाद रोकडेला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात सुमारे १६ गुन्हे दाखल आहेत.

सीसीटीव्हीत घटना कैद

रस्त्यावर लागलेल्या स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना कैद झाली आहे. आरोपी आणि मृत त्यात दिसत आहेत. त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर भरचौकात नेऊ न खून करण्यात आल्याचे दिसून येते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 2:55 am

Web Title: political leaders banner murder akp 94
Next Stories
1 कुख्यात गुंड आंबेकरच्या संपत्तीवर टाच
2 ६३ टक्के उमेदवारांना एक हजाराहून कमी मते
3 दलित मतांचे विभाजन टळल्याने काँग्रेसला फायदा!
Just Now!
X