News Flash

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वाटताहेत निवडणूक ओळखपत्र

लोकसभा निवडणुकीसाठी नव्या मतदारांना ओळखपत्र वाटपाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून नव्या मतदारांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू असून त्याबाबत जिल्हा निवडणूक यंत्रणेचा अक्षम्य बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. नव्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने बनवलेले ओळखपत्र निवडणूक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हाताने मतदारांच्या घरी पाठवण्याचा प्रताप  जिल्हा निवडणूक यंत्रणेने केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नव्या मतदारांना ओळखपत्र वाटपाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वाडी परिसरात नव्या मतदारांना नुकतेच निवडणूक आयोगाने तयार केलेले रंगीत ओळखपत्र मिळाले. नियमाप्रमाणे हे नवे ओळखपत्र  बीएलओ यांनी मतदारांच्या घरी जाऊन देणे अपेक्षित होते मात्र, शेकडो मतदारांच्या घरी हे नवे ओळखपत्र राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पोहचवत आहे. मतदारांच्या ऐवजी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातून ओळखपत्र आधी पोहोचल्यामुळे मतदारही त्यात गोंधळले आहे. अनेक युवकांनी त्याबाबत विचारणा केली असताना आमच्याकडे जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाकडून आलेले हे ओळखपत्र जिल्हा निवडणूक यंत्रणेतील काहीनी बीएलओ यांच्या हातात देण्याऐवजी थेट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात देण्यात आले असून त्यांनी वाडी परिसरात वाटप सुरू केले आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणी आणि गलथान कारभाराबद्दल वाडी परिसरातील काही मतदारांनी आक्षेप घेतले तेव्हा हे प्रकरण समोर आले.

‘‘नव्या मतदारांची ओळखपत्र ही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातून वाटली जात असल्याचे समोर आले. याबाबत जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकाराबद्दल चौकशी सुरू केली आहे. चौकशीत निवडणूक यंत्रणेशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.’’

– अश्विन मुदगल,  जिल्हा निवडणूक अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:33 am

Web Title: political party workers distributing voting identity card
Next Stories
1 उच्च न्यायालयावर आरोप, वकील पोलिसांच्या ताब्यात
2 ‘चौकीदार’ म्हणून घेऊ नका तर समस्याही सोडवा
3 लोकजागर : विद्यापीठीय धुळवड!
Just Now!
X