नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंग पाटणकर आणि गडचिरोली-गोंदिया नक्षल परीक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांना एका विशेष समारंभात पदक देऊन गौरविण्यात येईल.

प्रतापसिंग पाटणकर हे १९८४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर नियुक्त झाले. त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात पहिली नियुक्ती मिळाली. त्यानंतर नंदूरबार, अहेरी, नवी मुंबई, चिपळून येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्य केले. १९९७ ला त्यांना पदोन्नती मिळाली आणि ते मुंबई येथे शस्त्रास्त्र विभागाचे उपायुक्त झाले. १९९९ मध्ये त्यांना आयपीएस कॅडर मिळाले. त्यानंतर मुंबईतच परिमंडळ-५, ७ आणि वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणून कार्य केले. पोलीस विभागाच्या कल्याणासाठी प्रकाशित होणाऱ्या दक्षता मासिकाचे त्यांनी संपादनही केले. पोलीस योजना विभागात कार्यरत असताना त्यांनी ५१ हजार ५९३ तात्पुरत्या पोलीस कर्मचाऱ्यांची पदे नियमित करण्यासाठी परिश्रम घेतले.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
supriya sule ajit pawar
“साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या”, अजित पवारांच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता

त्यांनी ठाणे आणि नागपूर येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही सेवा दिली. त्यानंतर त्यांची पदोन्नती विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र येथे करण्यात आली. पोलीस दलातील त्यांची उत्कृष्ट सेवा विचारात घेऊन त्याची राष्ट्रपती पोलीस पदकासाठी निवड करण्यात आली.

अंकुश शिंदे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी १९९२ ते १९९४ दरम्यान राजुरा या नक्षल प्रभावित क्षेत्रातून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर उस्मानाबाद उपविभागीय पोलीस अधिकारी, मुंबईत विशेष अभियानचे उपायुक्त होते.

२००३-४ मध्ये ते मुंबईत परिमंडळ-१२ चे उपायुक्त असताना ग्लेंडा झिसोझा यांचा ६ वर्षांचा मुलगा आणि ७५ वर्षीय आईच्या खुनाच्या खटल्याचा तपास त्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालयात मुख्यालय उपायुक्त होते.

त्यावेळी भिवंडीमध्ये उसळलेली दंगल शांत करण्यात त्यांचे योगदान आहे. भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका तरुणाच्या खून प्रकरणात १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

या प्रकरणाच्या तपासात त्यांनी मार्गदर्शन केले. रायगड येथे पोलीस अधीक्षकही, राज्य राखीव पोलीस बलाच्या ११ क्रमांकाच्या तुकडीचे कमांडंट, मुंबईत विशेष शाखेचे उपायुक्त अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.ते नाशिक ग्रामीणचे अधीक्षक  झाले. तेथून त्यांना उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आणि त्यांची बदली नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी करण्यात आली.

मात्र, त्यांनी शहरात काम न करता गडचिरोली व गोंदिया येथील नक्षल प्रभावित भागासाठी काम करण्याची इच्छा दर्शविली. त्यानुसार ते जून २०१७ मध्ये उपमहानिरीक्षकपदी रुजू झाले.

तेव्हापासून त्यांनी गडचिरोली-गोंदियातील नक्षलप्रभावित क्षेत्रात काम करीत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रपती पोलीस पदकासाठी निवड करण्यात आली.