गुन्हे शाखा तपास करणार

नागपूर : ‘लुटेरी दुल्हन’ असे ‘विशेषण’ लाभलेल्या प्रीती दासविरुद्ध दाखल सर्व प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आज सोमवारी तिला जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ाप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल

पाचपावली, जरीपटका, लकडगंज आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. तिच्याविरुद्धच्या तक्रारींचा ओघ सुरूच असून २० जूनपर्यंत ती पाचपावली पोलिसांच्या ताब्यात होती. तिची पोलीस कोठडी संपताच न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिची कारागृहात रवानगी केली. कारागृह प्रशासनाने करोना चाचणी केल्यानंतर तिला कोठडीत विलगीकरणात ठेवण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तिच्याविरुद्ध दाखल गुन्ह्य़ांचा तपास पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर, उपनिरीक्षक राजकुमार त्रिपाठी आणि दोन महिला अधिकारी करीत आहेत. जरीपटका पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध एकाला २५ हजारांनी लुबाडण्याचा गुन्हा दाखल आहे. तिने भरोसा सेलच्या नावाखाली एका व्यक्तीला धमकावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार उकळले होते. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांच्या मार्गदर्शनात संबंधिताने तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्य़ात तिची पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला तिची तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.