28 October 2020

News Flash

विद्यापीठ परीक्षेचा पोरखेळ सुरूच

औषधनिर्माण शास्त्राच्या परीक्षा स्थगित; आज पहिल्या सत्रात होणार परीक्षा

औषधनिर्माण शास्त्राच्या परीक्षा स्थगित; आज पहिल्या सत्रात होणार परीक्षा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षांचा पोरखेळ पुन्हा आज गुरुवारीही पाहायला मिळाला. अनेक विद्यार्थ्यांचे लॉगिन उशिरा झाल्याने त्यांना पेपर सोडवण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचा वेळ मिळाल्याच्या तक्रारी आहेत. तर व्होडाफोन-आयडिीााच्या नेटवर्क समस्येमुळे बहुतांश परीक्षांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे औधनिर्माण शास्त्राचा शेवटच्या सत्रात असलेला पेपर स्थगित करून तो शुक्रवार १६ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता घेतला जाणार आहे.

व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कमुळे नागपूर विद्यापीठाच्या सातव्या दिवशीच्या परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. पहिला टप्पा सुखरूप आटोपल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा उशिरा सुरू करण्यात आल्यात. यातही बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉगिन करता आले नाही.

व्होडाफोन-आयडियाचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांनी जीओ नेटवर्कचा वापर केला. त्यामुळे एकाच नेटवर्कवर सर्वाधिक भार आल्याने तेही सुरळीत काम करू शकले नाही. परिणामी दुसऱ्या सत्रातील ११.३० वाजताची परीक्षा १.३० वाजता सुरू झाली, तर दुपारी १.३० वाजता तिसऱ्या सत्राच्या परीक्षेलाही सुरुवात झाल्याने इतर विद्यार्थ्यांनीही लॉगिन करायला सुरुवात केली. एकाचवेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी परीक्षेला लॉगिन करत असल्याने गोंधळ निर्माण झाला. परिणामी अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित असल्याची माहिती आहे. या सर्व समस्यांमुळे शेवटच्या सत्रात असलेल्या परीक्षा घेणे अशक्य असल्याने विद्यापीठाने औषध निर्माणशास्त्राच्या परीक्षाच रद्द केल्या. त्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा स्थगित करीत त्या शुक्रवारी सकाळच्या सत्रात घेण्यात येणार आहेत.

विद्यार्थी कॉपी करीत असल्याची चित्रफीत प्रसारित

अंतिम वर्षांच्या परीक्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात कॉपी होत असल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर फिरत आहे. अनेक विद्यार्थी एका खोलीमध्ये बसून प्रश्न व त्याची उत्तरे पुस्तकामध्ये शोधत असल्याचे या चित्रफितीमध्ये दिसत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने परीक्षांच्या नावावर विनोद सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:46 am

Web Title: problem continues in nagpur university examinations zws 70
Next Stories
1 काळे कृषी कायदे महाराष्ट्रात रोखणार
2 ४९ टक्के गावातच पिण्याचे पाणी
3 पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्धचे खटले लवकर निकाली निघावेत
Just Now!
X