१.५ ग्रॅम वजन आणि २३ सेंटिमीटरचे पंख; एरोमॉडेलर राजेश जोशी यांचे यश

नागपूर : उपराजधानीत १.५ ग्रॅम एवढय़ा हलक्या वजनाचे आणि २३ सेंटिमीटरचे पंख असणाऱ्या बांबूच्या अतिशय बारीक व पातळ तुकडय़ांपासून विमान तयार करण्यात एरोमॉडेलर राजेश जोशी यांना यश आले आहे. अवघ्या आठ दिवसात तयार झालेल्या या विमानाचे यशस्वी उड्डाण त्यांनी के ले.

एक वर्षांपूर्वी जोशी यांनी तीन ग्रॅम वजनाचे विमान तयार के ले होते. मानकापूर येथील ‘इनडोअर स्टेडियम’मध्ये या विमानाचे प्रात्यक्षिक झाले तेव्हा सारेच अवाक् झाले होते. टाळेबंदीमुळे कु ठे जाता येत नसल्याने करायचे काय, हा प्रश्न त्यांना पडला. झेकोस्लाव्हाकियात अशा पद्धतीने विमान तयार झाले होते. आपणही ते का करू नये, असा विचार त्यांच्या मनात आला आणि रामनवमीच्या दिवशी त्यांनी हे विमान तयार करण्यास सुरुवात के ली. कु ठेतरी पडलेली एक बांबूची बारीक काडी त्यांना दिसली. घरी आणून ती स्वच्छ धुतली आणि येथून त्यांच्या कामाचा श्रीगणेशा झाला. त्याच्या अतिशय बारीक व पातळ अशा काडय़ा तयार के ल्या. विमानाचे पंख तयार करण्यासाठी कागदाचा अतिशय पातळ असा पापूद्रा त्यांनी काढला. गिटारची  एक तार आणि घरी पत्नीच्या जुन्या मंगळसूत्रातील बारीक मणी, दात कोरण्याची काडी, साधा शिवण्याचा दोरा आणि जेल स्वरुपातील फे विक्विकचा वापर करत त्यांनी विमानाला आकार देण्यास सुरुवात के ली. दिवसरात्र एक करत अवघ्या आठ दिवसात त्यांनी हे विमान तयार के ले आणि या विमानाचे यशस्वी उड्डाण देखील के ले. हवा नसताना बंद खोलीत हे विमान उडवावे लागते. याला हवा लागत नाही, पण कार्यकु शलता लागते. रिमोटच्या आधाराविना उडणाऱ्या या इनडोअर विमानाला त्यांनी ‘भारत एक’ असे नाव दिले आहे. अतिशय हलके  १.५ ग्रॅम वजनाच्या या विमानाचे प्रात्यक्षिक त्यांना देशाच्या पंतप्रधानांसमोर सादर करायचे असून त्यांना ते भेट द्यायचे आहे.

निसर्ग आपल्याला खूप काही देतो, फक्त त्याचा सदुपयोग आपल्याला करता यायला हवा. इंडियन नेव्हीतून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यांकडून १९०० रुपयाला एक असेच १.४ ग्रॅमचे विमान मी आणले होते. जगातील हे पहिले विमान असे त्यावर लिहिले होते. मात्र, ते यंत्राच्या सहाय्याने तयार के ले होते. आपण हाताने आणि सहज उपलब्ध असलेल्या बांबूच्या सहाय्याने ते का बनवू नये, हा विचार आला आणि ते तयार झाले. अवघे पाच ते दहा रुपये इतका खर्च त्यासाठी आला.

– राजेश जोशी.