आज जागतिक व्यंगचित्रकार दिन
व्यंगचित्र हा वर्तमानपत्राचा आत्मा आहे, अविभाज्य घटक आहे. कारण, चित्राच्या एका रेषेत हजारो शब्दांचा ऐवज सामावलेला असतो. व्यंगचित्रकार या पेशाला आर.के. लक्ष्मण यांनी ओळखच नव्हे, तर प्रतिष्ठा मिळवून दिली, पण योग्य मार्गदर्शनाअभावी आधुनिक काळात ही कला कुठेतरी मागे पडत चालली आहे. जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व व्यंगचित्रकार एकत्र आले असून हरवत चाललेली ही प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
cartoon2
स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रासोबतच व्यंगचित्राचाही भारतीय समाजात उगम झाला. चित्रकला हा व्यंगचित्राचा पाया आहे आणि व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे. असे असले तरीही ही अखेरची पायरीच कलावंताची खरी कसोटी घेणारी आहे. चित्रकलेसाठी अभ्यासक्रम असला तरीही व्यंगचित्रकारितेसाठी अभ्यासक्रम नाही. विशेषत: विदर्भात कलेची अनेक दालने आहेत, तरीही व्यंगचित्रकलेला त्यात कुठेच स्थान नसल्याची खंत वैदर्भीय व्यंगचित्रकारांना आहे. त्यातच आता संगणकाचे वाढते प्रस्थ व्यंगचित्रकारितेवर मात करते की काय, अशीही एक भीती आहे. संगणकाने सर्व कामे गतीमान केलेली असताना व्यंगचित्रकला त्यातून कशी सुटणार? मुळातच पूर्वीसारखे दर्जेदार व्यंगचित्रकार फार कमी. त्यात वाचन, आकलनशक्ती हे व्यंगचित्राचे मूळ असले तरीही त्यासाठी फारसा कुणाला वेळ नाही. त्यामुळे वाचन, आकलनातून जिवंत होणाऱ्या व्यंगचित्राचा आत्मा कुठेतरी हरवल्यागत झाला आहे.
आवड असेल आणि चित्र काढण्याची कला अवगत असेल, तर व्यावसायिक व्यंगचित्रकला हा करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो. व्यावसायिक व्यंगचित्रकार होण्यासाठी हस्ताक्षरे, चांगली चित्र काढणे, रंग भरणे आदी कलेचे प्रशिक्षण घेण्याची गरज असते, तरीही भावना, विचार व्यंगचित्रातील विविध पात्रांच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी वाचन, आकलनशक्तीच आवश्यक आहे. अनेक वृत्तपत्रे, प्रकाशने, मासिके, संकेतस्थळे व्यंगचित्राच्या रूपातून संदेश देताना दिसतात, त्यामुळेच नवी पिढी याकडे वळावी म्हणून आता ठिकठिकाणी प्रदर्शने, कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यंगचित्रकला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाहिजे तसे महत्त्व नाही -संजय मोरे
व्यंगचित्रकलेत तंत्रज्ञाचा शिरकाव झाला असला तरीही पूर्णपणे हाताने चितारल्या जाणाऱ्या व्यंगचित्राची मजा वेगळीच आहे. दहा अग्रलेखांची बरोबरी एक व्यंगचित्र करू शकते. आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे यांनी ते दाखवून दिले आहे. मात्र, अलीकडच्या काळात पाहिजे तसे महत्त्व व्यंगचित्रकलेला आणि व्यंगचित्रकाराला दिले जात नाही, अशी खंत व्यंगचित्रकार संजय मोरे यांनी व्यक्त केली.

संगणक हेही माध्यम-चारोळे
व्यंगचित्रकारांचे दिवस फारसे चांगले नाही, पण भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील. हाताने व्यंगचित्र काढण्याची मजा वेगळीच आहे, पण गतीमान काळात संगणकाची मदत घेण्यावाचून पर्याय नाही. व्यंगचित्रासाठी पेन्सिल व रंग हे जसे एक माध्यम आहे, तसेच संगणक हे देखील एक माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमाचा अतिरेक नाही, पण वापर नक्कीच करायला हवा, असे मत व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी व्यक्त केले.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा