दलित साहित्यातील नव्या वैचारिक दिशेचा शोध राकेश वानखेडे यांनी ‘पुरोगामी’ या कादंबरीत घेतला आहे. या कादंबरीवर प्रगतिशील लेखक संघ व संविधान फाऊंडेशन, तसेच मुंबईचे लोकवाङ्मयगृह यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २६ मार्चला सायंकाळी ६ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
आमदार निवास सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके राहणार आहेत. सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि प्रा.डॉ. इंद्रजित ओरके या परिसंवादात सहभागी होणार आहेत.