News Flash

गावांच्या योग्य पुनर्वसनामुळे वाघांना हक्काचा अधिवास !

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हे पुनर्वसन प्रक्रियेत अग्रेसर आहेत.

नागपूर : व्याघ्रप्रकल्पातील गावांना जंगलापासून फार लांब न नेता शहर आणि जंगलाजवळच त्यांचे पुनर्वसन केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात या पद्धतीने पुनर्वसन केल्यामुळे  त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहेत. चुर्णी, वैराट, पस्तलाई या भागात आदिवासींनी पुनर्वसनाला दाद दिल्यामुळे हा भ्रमणमार्ग वाघांसाठी पोषक ठरला आहे. या भागात सातत्याने व्याघ्रदर्शन होत आहे. शनिवारी पस्तलाई येथील शिक्षिकेला तब्बल अर्धा तास व्याघ्रदर्शन झाले.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हे पुनर्वसन प्रक्रियेत अग्रेसर आहेत. १९९७ मध्ये महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पाची पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली. बोरी, कोहा, कुंड या तीन गावांचे पुनर्वसन १९९७ आणि २००३च्या दरम्यान झाले. २०११ नंतर २२ ते २३ किलोमीटर दूर अंतरावरील वैराट, चुरणी आणि पस्तलाई या तीन गावांचे पुनर्वसन झाले. यातील वैराट आणि चुरणी गावांचे पुनर्वसन आधी तर वैराट हे व्याघ्रप्रकल्पाचा  चिखलदऱ्याजवळील गाभा क्षेत्र आणि महत्त्वाचा व्याघ्रअधिवास होता. बोरी, कोहा आणि कुंडलगतचा तो प्रदेश होता. त्यामुळे पस्तलाई गावाचे पुनर्वसन रखडले होते. वैराट आणि पस्तलाईच्या पुनर्वसन प्रक्रि येत तत्कालीन उपवनसंरक्षक रवींद्र वानखेडे व तत्कालीन क्षेत्रसंचालक डॉ. दिनेशकु मार त्यागी तसेच मेळघाटच्या संपूर्ण कर्मचाऱ्यानी गावकऱ्याशी संपर्क साधला. गावकरीही त्यासाठी स्वेच्छेने तयार झाले आणि या गावांचे पुनर्वसन झाले. पर्यटनावर भर न देता स्थानिक आदिवासींना रोजगार कसा उपलब्ध होईल आणि पुनर्वसन प्रक्रि येत कशी गती येईल, याकडे त्यांनी लक्ष दिले. त्याठिकाणी उत्तम कु रणविकासाचे कार्यक्र म राबवल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांचा वावर वाढला आणि वाघाला त्याचे भक्ष्य व अधिवास मिळाला. चिखलदरापासून ११ किलोमीटर अंतरावरील सर्वोच्च ठिकाण असणाऱ्या वैराटमध्ये वाघाला सलग संचार करण्यासाठी अधिवास मिळाला. कोहा आणि कुंड या गुगामल वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या गावांचेही पुनर्वसन झाल्याने याठिकाणी वाघांचा मुक्तसंचार आहे. मात्र, शनिवारी, १७ जुलैला पस्तलाई येथील शिक्षिके ला प्रथमच रस्त्यावर सुमारे अर्धा तास व्याघ्रदर्शन झाले.

गरजाही भागल्या, रोजगारही मिळाला

वैराट गावात सुमारे १५० घरे होती. याठिकाणी गवळी समाज मोठ्या प्रमाणात होता आणि चराईचा मोठा भार जंगलावर होता. तसेच कोरकूंचा देखील जंगलावर भार होता. मात्र, वनखात्याच्या हाके ला  ‘ओ’ देत ते पुनर्वसनासाठी तयार झाले. चांदूरबाजार परिसरातील घाटलाडकी भागात तसेच परतवाड्यातील नरसाळा भागात त्यांचे पुनर्वसन झाले. व्याघ्रप्रकल्पातून बाहेर करताना जंगलापासून त्यांना फार दूर न नेता लगतच्याच गावात पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या गरजाही भागल्या आणि त्यांना रोजगारही मिळाला.

व्याघ्रप्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासोबतच वाघांचे अस्तित्व असलेल्या अभयारण्यातील व व्याघ्रसंचार मार्गातील गावांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. संचारमार्गाची दुरवस्था पाहता याकडे तातडीने लक्ष दिल्यास मानव-वन्यजीव संघर्षसुद्धा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. विशेषकरून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेलगतच्या राज्यांची यावर संयुक्तपणे कृ ती अपेक्षित आहे. तसेच पुनर्वसन झालेल्या ठिकाणी अति पर्यटन न करता इतर पर्यायी वनक्षेत्र पर्यटनासाठी योग्य राहतील.

– यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 3:34 am

Web Title: proper rehabilitation of villages gives habitat to tigers zws 70
Next Stories
1 मेडिकलकडून ‘एम्स’च्या प्रस्तावाला केराची टोपली!
2 पद टिकवण्यासाठी सरपंचाचा अफलातून आटापिटा
3 आंतरजातीय विवाहावर टिपणी केल्याने खून
Just Now!
X