29 March 2020

News Flash

मेळघाटातील वाघशिकाऱ्यांना सक्तमजुरी

वनखात्याच्या इतिहासात प्रथमच सीडीआर आणि ध्वनीचित्रफितीला न्यायालयाने पुरावा म्हणून ग्राह्य धरले.

वनखात्याच्या इतिहासात प्रथमच सीडीआर व ध्वनीचित्रफिती पुरावा
आरोपींकडून जप्त केलेल्या भ्रमणध्वनींच्या सीडीआरवरून (कॉल डाटा रेकॉर्ड) आणि त्यांच्या बयाणांच्या ध्वनीचित्रफितीवरून अमरावती न्यायालयाने ढाकणा वाघ शिकार प्रकरणातील आरोपींना तब्बल ७ वष्रे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. वनखात्याच्या इतिहासात प्रथमच सीडीआर आणि ध्वनीचित्रफितीला न्यायालयाने पुरावा म्हणून ग्राह्य धरले. वाघ शिकार प्रकरणात सर्वाधिक शिक्षा झालेले भारतातील हे पहिले प्रकरण मानले जात आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सुमारे १०-११ वाघांच्या शिकारीचे प्रकरण तीन वषार्ंपूर्वी उघडकीस आले. त्यापैकी ढाकणा क्षेत्रातील वाघांची शिकार पहिल्यांदा उघडकीस आली. यात १३ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील चार वाघांच्या शिकाऱ्यांना पाच वष्रे सश्रम कारावासाची आणि ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. उर्वरित सहा वाघ तस्करांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. यापैकी सुरजपाल उर्फ चाचा हा दिल्लीतील तिहार कारागृहात असून त्याला ने-आण करण्यास त्रास होत होता म्हणून त्याच्यावर वेगळ्याने खटला चालवण्यात येत आहे. उर्वरित रणजित भाटिया, सरजू बावरिया व दलबीर बावरिया यांच्यावर खटला चालविण्यात आला. सर्व आरोपी हे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान कारागृहातच बंद होते. या आरोपींचा जामीन मुख्य न्यायदंडाधिकारी अमरावती व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेळोवेळी रद्द केला आहे. या प्रकरणात न्यायवैद्यक आणि इलेक्ट्रॉनिक्स पुरावे म्हणून दाखल करण्यात आले.
या दोघांनीच वाघाच्या शिकारीकरिता आदिवासींना प्रोत्साहित केले होते व मारलेल्या वाघाचे अवशेष १ लाख ६५ हजार रुपयात खरेदी करून आंतरराष्ट्रीय तस्कर सरजू बावरियाला विकले होते. सरजू हे अवशेष सुरजपालला विकत होता. रणजितला १६ डिसेंबर २०१३ ला आंध्रप्रदेशातील विजयवाडा जिल्ह्यातील कोरकुंडा रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, २००९ पासून रणजित सीबीआय प्रकरणातही फरार होता. सरजू हा एका संपूर्ण वाघाचे अवशेष विकण्यास जात असताना मेळघाट सायबर क्राईम सेलच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

’विशेष म्हणजे, या प्रकरणात वाघाचे अवशेष चीनमध्ये तस्करांनी आधीच विकल्यामुळे ते सापडले नव्हते. त्यामुळे आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या भ्रमणध्वनींचा सीडीआर आणि त्यांच्या बयाणाची ध्वनीचित्रफित पुरावा म्हणून सादर करण्यात आले.
’ रणजित आणि दलबीरची शिकार प्रकरणात महत्वाची भूमिका होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 12:21 am

Web Title: punishment to melghat hunters
Next Stories
1 ‘अधिवेशनातून’ पुराने दिन लौटा दो
2 शिवसेनेची तलवार म्यान
3 गोंधळाचा दुसरा दिवस ,संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधकांची आक्रमणाची धार तीव्र
Just Now!
X