News Flash

रेल्वे प्रवाशाचा गुदमरून मृत्यू?

गाडी सकाळी सात वाजताच्या सुमारात नागपुरात फलाट क्रमांक एकवर येऊ न थांबली.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : करोनाची लक्षणे असलेल्या एका प्रवाशाचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याने सहप्रवाशी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. या मृत प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे काही प्रवाशांचे तर प्रवाशांच्या गर्दीत त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे काहींचे म्हणणे होते. ही घटना सोमवारी सकाळी नागपूर स्थानकावर घडली.

बखोरी शिवान पासवान (७०) रा. सुमेरा, जि. जहानाबाद (बिहार) असे मृताचे नाव आहे. त्यांचा मुलगा सत्येंद्रने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यांपासून बखोरी यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळेच दोघेही घरी परतत होते. एर्नाकुलम – पटना स्पेशल एक्स्प्रेसच्या एस-८  रेल्वेडब्यातून त्यांचा प्रवास सुरू होता. ही गाडी सकाळी सात वाजताच्या सुमारात नागपुरात फलाट क्रमांक एकवर येऊ न थांबली. त्याचवेळी बखोरी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सत्येंद्रने त्यांना धीर देत शांत करण्याचा प्रयत्न केला. श्वास घेण्यास त्रास आणि ते सतत खोकलत असल्याने अन्य प्रवाशांनी त्यांना करोना झाल्याचा अंदाज बांधला. तशी कुजबूज डब्यात सुरू झाली. गाडी रवाना होत असताना बखोरी यांचा त्रास अगदीच असाह््य झाला. सत्येंद्रने साखळी खेचून गाडी थांबवून घेतली. फलाटावरील पोलीस संबंधित डब्याजवळ पोहोचले. सत्येंद्रने त्यांना खाली उतरवले. तातडीने रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. मात्र तपासताच त्यांना मृत घोषित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:05 am

Web Title: railway passenger suffocated to death akp 94
Next Stories
1 एकाच रुग्णाला तब्बल १२ रेमडेसिविर देण्यावरून वाद!
2 मुख्याध्यापक, लिपिकाला  लाच घेताना रंगेहाथ पकडले
3 पीएच.डी. मार्गदर्शकांची कमतरता दूर करण्यासाठी नवी नियमावली
Just Now!
X