02 July 2020

News Flash

विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न

घरात घुसून ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : घरात घुसून ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुटीबोरी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे.

रविवारी सकाळी पीडित विद्यार्थिनी घरी एकटी होती. संधी साधून तो युवक घरात घुसला. तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केली. तेव्हा तो पळून गेला. मुलीने नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी बुटीबोरी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

तरुणीवर सामूहिक अत्याचार

घरात घुसून दोघांनी २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना मौदा येथे घडली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

कुख्यात वाहनचोर गजाआड

गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात वाहनचोरांना गजाआड केले. चार मोटारसायकली व लॅपटॉप जप्त करण्यात आले.

अभिषेक मदनलाल सिन्हा  व प्रमोद राधेश्याम लिल्हारे, अशी अटकेतील चोरटय़ांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. रामनगर भागात वाहनचोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2019 1:06 am

Web Title: rape attempt on girl student in nagpur zws 70
Next Stories
1 नागपुरात एक दिवसाआड पाणी
2 मराठी शाळा बंद पडण्याला सरकारच जबाबदार
3 माळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी केंद्राचा ३४ कोटींचा निधी
Just Now!
X