News Flash

पीएच.डी. मार्गदर्शकांची कमतरता दूर करण्यासाठी नवी नियमावली

विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे.

प्राध्यापक स्तरावरील पर्यवेक्षकांना आठ उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची मुभा

 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. उमेदवारांना आणखी एक दिलासा दिला आहे. पीएच.डी. मार्गदर्शकांच्या कमतरतेच्या समस्येवर मात करण्यासाठी नागपूर विद्यापीठाने नवीन नियम लागू केला आहे. मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शकाच्या महाविद्यालयाला संशोधन केंद्राचा दर्जा नसल्यास अशा मार्गदर्शकास नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात नोंदणी करून उमेदवारांना मार्गदर्शन करता येईल.

विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. मात्र, अनेक संशोधकांना मार्गदर्शक मिळत नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतात. अनेकांना संशोधन करायचे असतानाही त्यांना मार्गदर्शक मिळत नसल्याने संशोधनापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने आता पीएच.डी. मार्गदर्शकांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार विद्यापीठाकडे त्या विषयाचा पदव्युत्तर विभाग नसल्यास अशा पर्यवेक्षकांना तो विषय असणाऱ्या कुठल्याही पदव्युत्तर विभाग असलेल्या महाविद्यालयातील संशोधन केंद्रात जाऊन नोंदणी करता येणार आहे. नागपूर विद्यापीठाने नुकतेच या नियमांसंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. त्याअंतर्गत प्राध्यापक स्तरावरील पर्यवेक्षकांना ८ पीएच.डी. उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सहयोगी प्राध्यापकांना ६ आणि सहाय्यक प्राध्यापकांना ४ उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पीएच.डी. उमेदवारांचे मार्गदर्शक बनण्यासाठी विद्यापीठाद्वारे पीएच.डी. असणे, पाच वर्षांचा अनुभव असणे आणि पाच शोधप्रबंध प्रकाशित असणे आवश्यक ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:05 am

Web Title: rashtrasant tukdoji maharaj nagpur university to phd candidates akp 94
Next Stories
1 ४५ वर्षांवरील नागरिकांचे आजही लसीकरण नाही
2 नियंत्रण कक्षाने पाठवलेल्या रुग्णाला रुग्णालय टाळू शकत नाही
3 ‘विकेल ते पिकेल’मध्ये ड्रॅगन फ्रूट आणि केशोरी मिरची!
Just Now!
X