News Flash

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात नियमबाह्य़ वातानुकूलित यंत्र

मेडिकलमध्ये देशाच्या विविध भागातून अनेक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी येतात.

मेडिकलला वीज बिलाचा ‘धक्का’; ओली पार्टीही रंगत असल्याची चर्चा]

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात नियम धाब्यावर बसवून काहींनी वातानुकूलित यंत्र (एसी) बसवले असून अनेक खोलीत विजेवरील शेगडीवर जेवणही बनवले जात आहे. वसतिगृहातील काही खोल्यांमध्ये महिन्याला अनेक दिवस ओली पार्टी रंगत असल्याने त्याचा मनस्ताप इतर विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना हे माहीत असतांनाही दोषींवर कारवाई होत नसल्याने त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मेडिकलमध्ये देशाच्या विविध भागातून अनेक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी येतात. शासकीय संस्थेत कमी दरात शिक्षण होत असल्याने अनेक विद्यार्थी हे मध्यम, गरीब घरातील असतात. या विद्यार्थ्यांच्या राहण्याकरिता शासनाने येथे अनेक वसतिगृह बांधले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या निवासी डॉक्टरांसह पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता येथे स्वतंत्र व्यवस्था आहे. वसतिगृहात कोणत्याही विद्यार्थ्यांला खोलीत कायद्याने स्वतचे वातानुकूलित यंत्र बसवणे तर सोडाच  कपडय़ांना इस्त्रीही करता येत नाही. परंतु बहुतांश खोल्यांमध्ये स्वयंपाकासाठी विजेच्या शेगडीचा वापर होत आहे.

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात अनेक महागडी इलेक्ट्रॉनिक यंत्रे लावली असून त्याचे विजेचे बिल मात्र मेडिकल प्रशासनाच्या खात्यातून जात आहे. प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना हा धक्कादायक प्रकार तोंडी तक्रारीसह विविध माध्यमातून कळत असतांनाही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना नियम तोडण्याची मूक संमती प्रशासन देत आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच निवासी डॉक्टरांच्या काही वसतिगृहात ओली पार्टीही रंगत असून त्याचा मनस्ताप इतर विद्यार्थ्यांना होत आहे. तक्रारी केल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे विद्यार्थी सांगतात. मेडिकलमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना उपचारादरम्यान व्यसन न करण्याचा सल्ला देणाऱ्या या संस्थेत हा प्रकार बंद होणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

औषधांचा मात्र ठणठणाट!

मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांसह इतर विद्यार्थ्यांकडून सर्रास विजेची उधळपट्टी होत असून हे बिल मेडिकलच्या खात्यातून जाते. परंतु उपचारादरम्यान जीवनाशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांकरीता संस्थेत अनेक औषधे उपलब्ध नसून रुग्णांना बाहेरच्या औषधालयाचा रस्ता दाखवला जात आहे. आर्थिक कुवत नसलेल्यांना बाहेरून औषध आणणे शक्य नाही. त्यांना रुग्णालयातून सुटी घेऊन घरी जाण्याशिवाय पर्याय नसल्याचेही रुग्णांचे नातेवाईक बोलून दाखवतात.

चौकशी करणार

वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून विजेचा गैरवापर होत असल्याबाबत तक्रार आलेली  नाही. परंतु प्रकरणाचे गांभीर्य बघता प्रशासनाकडून चौकशी केली जाईल. त्यात कुणी दोषी आढळल्यास प्रशासन कारवाई करेल.

डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2017 12:46 am

Web Title: resident doctor issue
Next Stories
1 शहरातील ‘सुपर रांदेन्युअर्स’ने १२०० किलोमीटरचा पल्ला गाठला
2 दुर्गम भागात सेवा देण्यास भावी डॉक्टर उदासिन
3 भाजपचे ‘सोशल इंजिनीअिरग’
Just Now!
X