करोनाकाळातील मरगळ काही प्रमाणात दूर

नागपूर : टाळेबंदीमुळे शहरातील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठा बंद असल्याने व्यवसायिकांना जवळपास शंभर कोटींवर फटका बसला. मोठे सण हातातून गेल्याने इलेक्ट्रॉनिक व्यवसायिक मोठय़ा आíथक अडचणीत सापडले होते. मात्र आता टाळेबंदीतून शिथिलता मिळाल्याने नागपूरकरांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने बाजापेठात परत चतन्य परतले आहे.

नागपुरात इलेक्ट्रॉनिक बाजारात दर महिन्याला कोटय़वधींची उलाढाल होते. मार्च, एप्रिल व मे महिन्यात लग्नाचा हंगाम असल्याने  व्यवसायिक ग्राहकांसाठी सज्ज झाले होते. त्यांनी मोठय़ा मालाची खरेदी केली होती. मात्र करोनाची दुसरी लाट येताच टाळेबंदी जाहीर झाली आणि अनेक महत्त्वाचे सण व्यवसायिकांच्या हातून गेलेत. लग्नाच्या हंगामात मोठय़ा सवलती जाहीर होत असल्याने नागरिक टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्रे, ओव्हन, मोबाईल, मिक्सर, लॅपटॉप, वॉशिंग मशीनसह अनेक उपकरणे खरेदी करतात. मात्र टाळेबंदी लागल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बाजारात खरेदीचा आलेख कमालीचा घसरला होता. त्यात ऑनलाईन खरेदी जास्त होत असल्याने त्याचाही वेगळा फटका व्यवसायिकांना बसला. व्यवसायिकांच्या मते टाळेबंदीच्या काळात शंभर कोटींहून अधिक नुकसान झाले. पुढील दोन वर्षे हा फटका भरूा काढण्यास आम्हाला लागणार असून आमचेही बँकेचे हप्ते लागलेले आहेत. याशिवाय बुटीबोरी आणि िहगणा औद्योगिक वसाहतीमध्ये काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक झोनमध्ये असलेले सर्व कारखान्यात उपकरणांना लागणऱ्या सुटे भागाचेही उत्पादन कमी झाले. कारण बाजारपेठा बंद असल्याने ग्राहकच नव्हते. त्यामुळे टाळेबंदीचा फटका न भरून निघणारा आहे. सध्या बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध होत असल्याने बाजारात उलाढाल होते. तसेच जुने उपकरणे देऊन नवीन वस्तू अधिक खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.