News Flash

नोटाबंदीनंतरची विरोधकांची विधाने हास्यास्पद

१९९५ ते २०१६ पर्यंतची आकडेवारी काढली तर सुमारे ३५ हजार नागरिकांचा जीव अतिरेकी कारवाईने गेला आहे.

अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांचा टोला

भारतात काळ्या पैशावर कारवाई करण्याकरिता जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत विरोधकांनी निर्णय चांगला परंतु पुरेशी तयारी नसण्यासह विविध आरोप करणारी विधाने केली. त्याची माहिती आधीच झाली असती तर त्याचा लाभ काय हा प्रश्नच आहे. विरोधकांची नोटाबंदीनंतरची विविध विधाने हास्यास्पद असून याचे दुरोगामी परिणाम दिसून येतील, असे मत अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. रोटरी क्लबच्या परिषदेत ते बोलत  होते.

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रत्येक ४ ते ५ वर्षांनी केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेतील सुधारणाकरिता जुन्या चलनातील नोटा बाद करण्याचा प्रस्ताव दिला जातो. परंतु एकाही पंतप्रधान वा सरकारने हा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नाही. तेव्हा हा धाडसी निर्णय घेण्याची क्षमता पंतप्रधान मोदी यांच्यातच असल्याचे स्पष्ट झाले. विरोधकातील विविध नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी १६ लाख ५० हजार रुपयांच्या नोटांपैकी केवळ ४०० कोटींच्या बनावट नोटा आढळल्याचे वक्तव्य केले. शेजारील राष्ट्रांकडून तयार होणाऱ्या या बनावट नोटा मोठय़ा प्रमाणावर अतिरेकी कारवाईकरिताही वापरल्या जात होत्या. तेव्हा या नोटाबंदीचा परिणाम फार महत्त्वाचा ठरणार आहे, असे जाधव म्हणाले.

१९९५ ते २०१६ पर्यंतची आकडेवारी काढली तर सुमारे ३५ हजार नागरिकांचा जीव  अतिरेकी कारवाईने गेला आहे. विरोधकांचा दावा बघितला तर भारताची लोकसंख्या १२५ कोटी असून त्या मानाने फार कमी मृत्यू झाल्याचे म्हणणे योग्य ठरणार नाही. प्रत्येक जीव महत्त्वाचा असून भविष्यात या निर्णयाचे फार सकारात्मक परिणाम दिसतील. नोटाबंदीमुळे या वर्षी सकल राष्ट्रीय उत्पन्न सुमारे एक टक्क्याने कमी झाले तरी भविष्यात ते पुन्हा मोठय़ा प्रमाणावर वाढेल. नोटाबंदीला विरोध करणाऱ्या विविध लोकप्रतिनिधींची वक्तव्ये बघितली तर ती हास्यास्पद असल्याचा टोला नरेंद्र जाधव यांनी लगावला.

पंतप्रधानांनी या निर्णयाकरिता चांगली वेळ साधली असून रिझव्‍‌र्ह बँकेला सूचना देऊन आधी तयारी केल्यास हा निर्णय इतरांना कळून त्याचा परिणाम कमी झाला असता. या निर्णयाकरिता पंतप्रधानांनी उत्तम गोपनीयता व तयारी केली. जगात भारत व चीन या दोन वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था असून दोन्ही देशांचे महत्त्व जगाला कळले आहे. त्यातच विविध विकासाचा वेग बघला भारत निश्चितच विकसित राष्ट्र होणार आहे.  नोटाबंदीनंतर बहुतांश नोटा बँकेत आल्या असून त्याचा तपास केल्यावर लवकरच काळा पैसा किती आला याचे आकडे बाहेर येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2017 12:32 am

Web Title: ridiculous statements of opposition after demonetization say economist narendra jadhav
Next Stories
1 घोडाझरीला गेलेला नागपूरचा ट्रॅक्टर उलटून ४६ महिला जखमी
2 भाजपचा शक्तिप्रदर्शनाचा गोंधळ
3 काँग्रेसचे आंदोलन
Just Now!
X