23 November 2020

News Flash

नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा; १३ लाखांची रोकड लंपास, सुरक्षा रक्षकाची केली हत्या

ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारत पेट्रोलियम पंपावर घडली. दरोडेखोरांनी जाताना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही लंपास केले आहेत.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

नागपुरात अज्ञात व्यक्तींनी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकून १३ लाखांची रोकड लंपास केली. दरम्यान, दरोडेखोरांनी पंपावरील सुरक्षा रक्षकाची हत्या केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारत पेट्रोलियम पंपावर घडली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

अधिक माहिती अशी, शहरातील श्रीगुरूदेव नगर येथे भारत पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बँका बंद असल्यामुळे पेट्रोल पंपाची मोठी रक्कम कार्यालयात होती. दरोडेखोरांनी त्याचाच फायदा घेत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास या पंपावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी १३ लाखांची रोकड लंपास केली. त्यावेळी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक नूर खान यांची दरोडेखोरांनी हत्या केली. दरोडेखोरांनी जाताना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही लंपास केले आहेत. त्यामुळे नेमके दरोडेखोर कोण होते, याची माहिती अद्याप समजलेली नाही. पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 12:21 pm

Web Title: robbery on nagpurs petrol pump killing one 13 lakhs robbed
Next Stories
1 एक लाख झोपडपट्टीधारकांना हक्काची जागा देणार – मुख्यमंत्री
2 नागपूर पोलिसांसाठी ९५० कोटींचा निधी
3 कारमध्ये ३.१८ कोटींची रोकड सापडली
Just Now!
X