खामला परिसरातील रस्त्याविरुद्ध ‘कॅग’चे आंदोलन

नागपूर : नागरी सुरक्षा नियम वेशीवर टांगून शहरात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. असाच एक रस्ता ऑरेंज सिटी रुग्णालय ते खामला दरम्यान बांधण्यात येत असल्याने सिव्हीक अ‍ॅक्शन गिल्ड फाऊंडेशन (कॅग) ने आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Shilphata road affected people
शिळफाटा रस्ते बांधितांना ३०७ कोटींची नुकसान भरपाई, शिळफाटा रस्ता संघर्ष समितीच्या लढ्याला यश
Funeral on the road Amdapur police registered a case against 35 villagers
मृतदेहाची अवहेलना! रस्त्यावरच दहन, गावात तणाव; जाणून घ्या सविस्तर…

सिमेंट रस्त्यांच्या बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी महापालिका आणि पोलीस विभागाकडून काही अटी व शर्ती घालण्यात येतात. यात प्रामुख्याने सिमेंट रस्त्याचे बांधकाम करताना बाजूचा अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करणे, लोकांच्या सुरक्षेसाठी कठडे उभारणे, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वयंसेवक नेमणे, वळण, रस्ता बंद आहे आदी स्वरूपाचे दिशादर्शक दिवसरात्र दिसतील अशी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. पण, हे नियम वेशीवर टांगून कंत्राटदार सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करतात. ऑरेंज सिटी रुग्णालय ते खामला, विमानतळ मार्गावरही सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. पण, या ठिकाणी लोकांच्या सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून कंत्राटदार केवळ काम रेटत आहे.

निम्म्या रस्त्यावर सिमेंटचे बांधकाम करताना कठडे उभारण्यात आले नाहीत. शिवाय अपूर्ण सिमेंट रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. सिमेंट रस्त्यांच्या सळईचे टोक रस्त्याच्या दिशेने निघालेले असून दुचाकीस्वार त्यावर पडल्यास जीव जाण्याची

भीती आहे.

दिशादर्शक फलकही दिसत नसून दररोज या मार्गावर चार ते पाच किरकोळ अपघात होत आहे. यासंदर्भात सिव्हीक अ‍ॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने (कॅग) या ठिकाणी आंदोलन करून कंत्राटदार व प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली, अशी माहिती कॅगचे विवेक रानडे यांनी दिली.