News Flash

‘स्कूलबस’च्या अभ्यासानंतर शाळेच्या वेळापत्रकांत बदल!

समितीकडून प्रत्येक शाळेत स्थानिक समिती करून विविध महत्त्वाच्या विषयावर बैठकांचा निर्णय झाला.

school bus
प्रतिनिधिक छायाचित्र

उपराजधानीत प्रथमच प्रयोग

उपराजधानीतील लक्षावधी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचवण्याकरिता अनेक स्कूलबस चालक गतीच्या नियमांचा भंग करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मुलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिवहन सुरक्षितता समितीने प्रथमच शहरातील स्कूलबसच्या गतीचा अभ्यास करून शाळांच्या वेळापत्रकांत किरकोळ बदलाचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याकरिता शालेय शिक्षण विभागाचीही मदत घेतली जाणार आहे.

नागपूरसह महाराष्ट्रात स्कूलबस, स्कूलव्हॅन, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ऑटोरिक्षा या वाहनांचे वाढते अपघात बघता काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने कडक कायदे केले. अंमलबजावणीकरिता स्कूलबस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षांमध्ये आवश्यक बाबींची एक मार्गदर्शक सूचना जारी होऊन प्रत्येक जिल्ह्य़ात जिल्हा परिवहन सुरक्षितता समिती गठित झाली. समितीकडून प्रत्येक शाळेत स्थानिक समिती करून विविध महत्त्वाच्या विषयावर बैठकांचा निर्णय झाला. जिल्ह्य़ातील २०५ शाळेत अद्याप समित्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता जिल्हा परिवहन समितीकडून हल्ली पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत शहरातील प्रत्येक स्कूलबलला शाळेत पोहोचण्याकरिता लागणाऱ्या वेळेचा अभ्यास होणार आहे.

शहरातील सगळ्याच स्कूलबसमध्ये किती शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होते, प्रत्येक बसला विविध मार्गावरील वर्दळ बघता शाळेत पोहोचण्यासाठी किती अवधी लागतो, शाळेच्या वेळापत्रकासह स्कूलबसला निश्चित गतीनुसार पोहोचायला किती अवधी लागतो, त्याकरिता स्कूलबसला किती गतीने जावे लागते, या व इतरही सगळ्याच बाजूवरील अभ्यासाचा समिती विचार करेल. शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्याकरिता नागपूरचे जिल्हा स्कूलबस परिवहन समितीचे अध्यक्ष नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, पोलीस उपायुक्त (वाहतूक) स्मार्तना पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालकही प्रयत्न करत आहेत. लवकरच समितीकडून अभ्यास सुरू होईल.

,८३० शाळांना स्कूलबसची गरज नाही

नागपूर जिल्ह्य़ातील विविध शाळांकडून आलेल्या अहवालानुसार तब्बल १ हजार ८३० शाळांनी त्यांना स्कूलबस व स्कूलव्हॅनची गरज नसल्याचे जिल्हा परिवहन समितीला कळवले आहे. या शाळांत मोठय़ा प्रमाणावर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नागपूर महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे. जिल्ह्य़ातील २९७ शाळांकडे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्वत:चे वाहन आहे, हे विशेष.

,३२६ शाळेकडे स्वत:चे वाहन नाही

नागपूर जिल्ह्य़ात सगळ्याच संवर्गातील एकूण ४ हजार ६० शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १ हजार ५७९, नागपूर महापालिकेच्या १६४, नगर परिषदेसह नगरपालिकांच्या ६९, खासगीच्या १ हजार १७८, खासगी विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित/ मदरसाच्या १ हजार, शासकीय २१ आणि इतर संवर्गातील ४९ शाळांचा समावेश आहे. या शाळेतील लक्षावधी विद्यार्थ्यांची रोज जिल्ह्य़ातील ३ हजार ११८ स्कूलबस आणि स्कूलव्हॅनने वाहतूक केली जाते. या वाहनांमध्ये नागपूर शहरातील १,९१८ तर ग्रामीणच्या १ हजार २०० स्कूलबस, स्कूलव्हॅनचा समावेश आहे. एकूण शाळांपैकी १३२६ शाळांकडे स्वत:ची स्कूलबस व स्कूलव्हॅन नसून त्या खासगीसोबत करार करून सेवा देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 12:52 am

Web Title: school bus issue in nagpur
Next Stories
1 आरक्षित वॉर्डात कार्यकर्त्यांनाच संधी द्या
2  ‘एबी फॉर्म’ शेवटच्या दिवशी
3  नागपूर देशातील पहिला ‘डिजिटल’ जिल्हा
Just Now!
X