27 May 2020

News Flash

हरवलेला फोन दिल्लीत सापडल्याने विलगीकरण!

‘मरकज’ला न जाताही नागपूरच्या चौघांना फटका

संग्रहित छायाचित्र

 

हरवलेला मोबाइल फोन दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात सापडल्याने नागपूरच्या एका महिलेला थेट विलगीकरणात जावे लागले आहे. त्याचप्रमाणे मनालीहून दिल्लीमार्गे परत येताना रेल्वेत करोनाबाधित रुग्ण असल्याने एका दाम्पत्याला आणि कामानिमित्त दिल्लीमार्गे गुडगावला गेलेल्या येथील एका व्यक्तीला सावधगिरीची बाब म्हणून विलगीकरणात राहावे लागत आहे.

दिल्लीतील मरकजमध्ये उपस्थित राहून परतलेल्यांपैकी अनेक जण करोनाबाधित असल्याचे आढळल्यावर केंद्र सरकारने तेथे गेलेल्या सर्वाची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यांच्या नावांची यादीही पाठवली होती. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने या व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. यात एक महिलाही आहे. तिचा मोबाइल फोन चोरीला गेला होता. तो दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये सापडला. सीमकार्डवरून या महिलेचे नाव दिल्लीतून पाठविलेल्या यादीत अंतर्भूत करण्यात आले आणि तिला विलगीकरण कक्षात जावे लागले.

मनालीला गेलेले दाम्पत्य दिल्लीमार्गे रेल्वेने परत आले. त्यांच्या डब्यात मरकजमध्ये सहभागी झालेली व्यक्ती होती. असाच प्रकार उद्योगाशी संबंधित कामासाठी गुडगावला गेलेला स्थानिक नागरिकाच्या बाबतही घडला. ते सध्या विलगीकरण कक्षात आहेत. विशेष म्हणजे, हे तिघेही मुस्लीम धर्मीय नाहीत. त्यांची चाचणी नकारात्मक आली आहे. मात्र सावधगिरीची बाब म्हणून त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात थांबणे आवश्यक आहे.

विलगीकरणात समुपदेशन

स्थानिक प्रशासनाने विलगीकरण कक्षात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनपेक्षितपणे ओढवलेल्या प्रसंगामुळे आणि कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्याने विलगीकरणात राहणाऱ्यांना भीतीने ग्रासले आहे. त्यांचे तेथे समुपदेशन केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:43 am

Web Title: separation for missing phone found in delhi abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 नागपुरात सर्वात कमी वजनाच्या विमानाची निर्मिती
2 पोलीस शिपायाचे मुलीशी अश्लील चाळे
3 उपराजधानीतील तरुण डॉक्टरमुळे देशहिताचा आदेश निघाला
Just Now!
X