16 October 2019

News Flash

नागपूरमधील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये छापा; दलाल अटकेत, महिलेची सुटका

पूजा रॉय नामक महिला तरुणींना देहव्यापार करायला भाग पाडते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर- वर्धा मार्गावरील रेडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री छापा टाकून एका दलाल महिलेला अटक केली आहे. तर पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे. देहव्यापारासाठी दोघीही या हॉटेलमध्ये आल्या होत्या.

नागपूर- वर्धा मार्गावर रेडिसन ब्ल्यू हे पंचतारांकित हॉटेल आहे. पूजा रॉय नामक महिला तरुणींना देहव्यापार करायला भाग पाडते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. उपायुक्त संभाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा रचला. पोलिसांनी एका खबरीला पूजा रॉयशी संपर्क साधायला लावला. खबरीने ग्राहक असल्याचे भासवत तिच्याशी संपर्क साधला. त्या महिला दलालाने खबरीला एका तरुणीचे फोटो पाठवले. तासाला १० हजार रुपये आकारले जातील, असे तिने खबरीला सांगितले. खबरीने महिलेला तरुणीसह रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये यायला सांगितले. ठरल्यानुसार सोमवारी रात्री महिला आणि तरुणी हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पीडित तरुणीची सुटका करण्यात आली असून ती मूळची कोलकाता येथील आहे. तर पूजा रॉयला पोलिसांनी अटक केली आहे.

First Published on January 8, 2019 1:12 pm

Web Title: sex racket busted police raid on radisson blu one arrested