28 September 2020

News Flash

दाम्पत्याकडून महिलेचे लैंगिक शोषण

राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत ‘गंदी बात’ उघड

राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत ‘गंदी बात’ उघड

नागपूर : झी-५ या अ‍ॅपवर काही वर्षांपूर्वी आलेली ‘गंदी बात-२’ या वेब सिरीजप्रमाणे उपराजधानीत पती व पत्नीने मिळून एका महिलेवर अनैसर्गिक संबंध स्थापित करून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी राणाप्रतापनगर पोलिसांनी  गुन्हा दाखल करून दाम्पत्याला अटक केली.

रामकिशन सोपालराम जांगीड (४४) आणि सरोज रामकिशन जांगीड (४०) रा. शांतीविाहर रेसिडेन्सी, दाते लेआऊट अशी अटकेतील  दाम्पत्याची नावे आहेत. पीडित ३८ वर्षीय महिला अजनी पोलीस  हद्दीत राहाते. तिच्या आईचे माहेर प्रतापनगर परिसरात आहे. २०११ ला तिच्या आईच्या घरी आरोपी रामकिशन जांगीड आणि पत्नी सरोज हे भाडय़ाने राहायला आले. पीडित आईकडे गेली की, सरोज तिच्याशी बोलायची. यातून दोघींची मैत्री झाली. एक दिवस सरोजने तिला खोलीत बोलावून लगट केली. तिने विरोध केला. पण, एकदिवस समलैंगिक संबंधासाठी पीडितेवर दबाव टाकला. त्यानंतर वारंवार हा प्रकार झाला. नंतर सरोजने पतीसाठी कट रचला. एक दिवस पीडितेला  खोलीत बोलावले. अचानक पती आल्यावर दोघीही आक्षेपार्ह स्थितीत दिसल्यानंतर तो रागावला. याबाबत पीडितेच्या आईला व कुटुंबीयांना सांगण्याची धमकी त्याने दिली. याबदल्यात त्याने पीडितेला शरीरसुखाची मागणी केली. सरोजनेही यासाठी दबाव टाकला. तिने भीतीपोटी त्याच्याशी संबंध प्रस्थापित केले. पण त्याचा व्हिडीओ सरोजने बनवून दोघेही पीडितेला धमकी देऊन शारीरिक संबंध स्थापित करीत होते. कालांतराने पीडितेला दोघांचाही कट लक्षात आल्यावर तिने पोलिसांत तक्रार केली. असेच कथानक ‘गंदी बात-२’  या वेब सिरीजमध्ये होते.

दहा वर्षांपासून प्रकार सुरू होता

गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. रामकिशनने मीनाला लग्नाचे आमिष दिले. तर पत्नी सरोजने दोघांशीही शारीरिक संबंध ठेवण्याची अट ठेवली. जांगीड दाम्पत्याने खोली बदलवली आणि सोनेगावमध्ये राहायला गेले. आता तिचे लग्नाचे वय उलटून गेल्यानंतर आरोपी तिला सोबत ठेवण्यास नकार देत होते. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:43 am

Web Title: sexual abuse of a woman by a couple zws 70
Next Stories
1 माझ्या लाडक्याला परत आणा हो..!
2 वनखात्याचे कायदे ना पर्यावरणहिताचे, ना रोजगारक्षम!
3 राज्यभरातील हौशी रंगकर्मीची शासनाकडूनच आर्थिक कोंडी!
Just Now!
X