News Flash

मराठी नेतृत्त्व संपवण्यासाठी हिंदीजनांचा कुटील डाव

शिवसेनेतील वादावर खासदार गजानन किर्तीकर यांचे मत

शिवसेनेतील वादावर खासदार गजानन किर्तीकर यांचे मत

मंगेश राऊत, नागपूर

नागपूर : विदर्भातील शिवसेनेचे दमदार मराठी नेतृत्त्व संपवण्यासाठी हिंदी भाषिक पदाधिकाऱ्यांकडून कुटील डाव रचण्यात येत असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध अंतर्गत कारस्थान करण्यात येत आहेत. याकरिता प्रसारमाध्यमे व पोलीस तक्रारींचा वापर करण्यात येत आहे, असे प्रखर मत शिवसेनेचे विदर्भाचे प्रभारी खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

नागपुरातील युवासेनेचा पदाधिकारी विक्रम राठोड, मंगेश कडवसारख्यांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे हे त्यांचे वैयक्तिक कृत्य आहे. त्यासाठी पक्ष कोणत्याही पातळीवर जबाबदार नाही. सध्या नागपूरचे नेतृत्त माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानपरिषद गाठली आहे. प्रकाश जाधव हे शिवसेनेचे जुने नेते असून प्रभावी व तडफदार आहेत. दुसरीकडे चतुर्वेदी यांना आता विदर्भात शिवसेनेच्या नेतृत्त्वाचे स्वप्न पडू लागले आहेत. त्यामुळे नागपुरातील प्रसिद्धीप्रमुख नितीन तिवारी व इतर हिंदी भाषिक पदाधिकारी मराठी पदाधिकाऱ्यांविरुद्ध कट रचत आहेत. याची सर्व कल्पना पक्षश्रेष्ठींना आहे. यातूनच हिंदी वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध करवणे, पोलीस ठाण्यांमध्ये एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी प्रवृत्त करून प्रकाश जाधव व इतरांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार पक्षासाठी अतिशय धोकादायक आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने काम केल्यास पक्ष वाढतो. पण, पैशांसाठी अंतर्गत कारस्थान करणे चुकीचे असून त्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे.

व्यक्तिगत लाभासाठी नेतृत्त्वाला बदनाम करण्याचा कट आखणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही किर्तीकर यांनी दिला.

अनेकांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव

पक्षांतर्गत कारस्थान करून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, नागपूर व विदर्भातील कार्यकारिणीत अनेक बदल करण्याचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुखांकडे सादर करण्यात आला आहे. नितीन तिवारीसारख्यांविरुद्ध लवकरच कारवाई करून अनेकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, अशी माहितीही किर्तीकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:44 am

Web Title: shiv sena mp gajanan kirtikar alleged hindi people to end marathi leadership zws 70
Next Stories
1 ११ दिवसांच्या अवकाशानंतर पुन्हा खून
2 पुन्हा टाळेबंदीवरुन प्रशासनात मतभिन्नता!
3 Coronavirus : सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच साडेसातशे पार
Just Now!
X