24 October 2020

News Flash

सेनेचा ‘फार्म्युला’ संघ, भाजपला मान्य होणार नाही

राज्यातील सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या घडामोडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री सरसंघचालकांची भेट घेतली.

मा.गो. वैद्य यांचे मत

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शिवसेनेचा ‘फाम्र्युला’ संघाला व भाजपला मान्य होणार नाही. मुख्यमंत्री भाजपचा होईल ही बाब शिवसेनेने मान्य केल्यास उपमुख्यमंत्री किंवा इतर पदे देण्याबाबत चर्चा होऊ शकेल. मात्र दोन्ही पक्षामध्ये संवाद होण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व विचारवंत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले.

राज्यातील सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या घडामोडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री सरसंघचालकांची भेट घेतली. परंतु या विषयावर सरसंघचालकांनी काहीही सांगितले नसणार. सामान्यपणे सरसंघचालक पक्षाला सत्तास्थापनेबाबत कुठलीही सूचना किंवा आदेश देत नसतात. कालच्या त्यांच्या भेटीत अयोध्या निकाल आणि त्यानंतर उद्?भवणारी स्थिती याविषयावर चर्चा झाली असणार. शिवसेना जर भाजपसोबत आली नाही आणि तिढा सुटलाच नाही  तर भाजपने सरकार स्थापन करावे आणि विश्वासमत सादर करण्यास सज्ज व्हावे. विश्?वासदर्शक ठराव नामंजूर झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर पुन्हा निवडणुका होण्याची शक्?यता आहे. पण आजघडीला महायुतीची सत्ता यावी ही अनेकांची इच्छा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशाही चर्चाना पेव फुटले आहे. याबाबत बोलताना वैद्य म्हणाले,  विधिमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे गडकरींचा महाराष्ट्रात येण्याचा प्रश्?नच उद्?भवत नाही. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील.

गडकरी-सरसंघचालक आज एकाच व्यासपीठावर

राज्यात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर उद्या गुरुवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येत आहेत. या कार्यक्रमात उभयतांमध्ये सद्यस्थितीतवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  गुरुवारी संघाचे ज्येष्ठ प्रचारक विलास फडणवीस यांच्या स्मृतीनिमित्त जिव्हाळा पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन समारंभ होणार आहे.यात सरसंघचालक  डॉ. मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 12:36 am

Web Title: shivsena bjp akp 94 8
Next Stories
1 शहरात उदंड झाली आंदोलने!
2 ‘सूर्यकिरण’चा आज प्राथमिक सराव
3 प्रीती बारिया हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप
Just Now!
X