द्या लक्ष्मीपूजन असल्यामुळे शहरातील बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी दिसून आली. गेल्या दोन दिवसात शहरातील विविध भागातील बाजारपेठेत कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली आहे.
लक्ष्मीपूजनासाठी रांगोळीपासून कपडे, आकर्षक वस्तू तर थेट गृहसजावटीपर्यंतच्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शहरातील विविध भागातील बाजारपेठेत गर्दी केली होती. सोमवारी घनत्रयोदशीच्या दिवशी सीताबर्डी, महाल इतवारी, गोकुळपेठ, सक्करदरा आणि इतवारी भागात झालेल्या गर्दीमुळे त्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. लक्ष्मीपूजनासाठी बाजारात लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. ४० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत लक्ष्मीची मूर्ती बाजारात उपलब्ध आहे.
या शिवाय प्रसादासाठी लाह्य़ा, बत्ताशे चिरंजी व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी होत आहे.
दिवाळीचे निमित्त साधून शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या वेगवेगळय़ा फॅशन्सच्या कपडय़ांची, दागिन्यांची बहार आहे. किराणा, रेडिमेट कपडे, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची लोकांनी खरेदी केली. सोने, आकाशकंदील, फटाके, भेटकार्ड, फराळाचे तयार पदार्थ खरेदीसाठी सर्वत्र गर्दी दिसून आली.
शहरात कस्तुरचंद पार्क आणि सीताबर्डी भगिनी मंडळ आणि लक्ष्मीनगर या भागात विविध वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, पणत्या, भेटकार्ड, तोरणे, रांगोळी, रांगोळीचे रंग, सुगंधी द्रव्य, अत्तरे, भेट द्यायच्या विविध वस्तू, लहान मुलांचे कपडे, आयुर्वेदिक औषधे, महिलांसाठीची सौंदर्यप्रसाधने, दिवाळीचा फराळ यासह अनेक वस्तूंची खरेदी केली जात आहे.