25 February 2021

News Flash

सिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान

मेळघाट व्याघ्रप्रकल्पाजवळ राहणाऱ्या आदिवासींना वनीकरणाच्या कामावर अवलंबून राहावे लागते.

उद्घाटन सोहोळ्यात बोलताना मुख्यमंत्री, अनिल देशमुख, नितीन राऊत, संजय राठोड, आदित्य ठाकरे व मिलिंद म्हैसकर.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन; बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन

नागपूर : देशात  नसेल अशाप्रकारचे सिंगापूरमधील प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय उद्यान उपराजधानीत तयार होईल. सिंगापूरसारखी रात्र सफारी याठिकाणी सुरू होईल. त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. २६ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी वनमंत्री संजय राठोड व प्रमुख पाहुणे म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील के दार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, खासदार कृ पाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, दुष्यंत चतुर्वेदी, अ‍ॅड. आशीष जयस्वाल, नरेंद्र भांडेकर, सुधीर सूर्यवंशी, वनखात्याचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, महापालिका आयुक्त राधाकृ ष्णन बी., प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) डॉ. एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) नितीन काकोडकर, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, मुख्य महाव्यवस्थापक ऋषिके श रंजन, पोलीस आयुक्त अमितेशकु मार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आदी वरिष्ठ अधिकारी तथा लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जंगल, वन्यजीव या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत आणि विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. प्रजासत्ताक दिन असतानाही के वळ वनमंत्र्यांच्या हट्टाखातर उद्घाटनाला आलो, पण हा प्रकल्प खरोखरच सुंदर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वाघाचे संवर्धन करण्यासाठी दिवं. इंदिरा गांधी यांनी व्याघ्रप्रकल्पाची संकल्पना आणली. विदर्भातील व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागपूरला व्याघ्र राजधानी ही नवी ओळख मिळाली आहे.

मेळघाट व्याघ्रप्रकल्पाजवळ राहणाऱ्या आदिवासींना वनीकरणाच्या कामावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वनखात्याने आदिवासींना वनीकरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी के ली. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समर्पक असून ठाकरे कु टुंबीयांनी त्यांचे आजोळ असणाऱ्या विदर्भाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी अपेक्षा पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त के ली. नागपूर ही खऱ्या अर्थाने देशाची तसेच जंगल आणि वाघाची राजधानी आहे. त्यादृष्टीनेच गोरेवाडा प्रकल्पाला चालना देण्यात येत आहे, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. शासनाने पहिल्या टप्प्यातील शंभर कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यामुळेच पहिल्या टप्प्यातील भारतीय सफारीचे उद्घाटन होत आहे.

उर्वरित निधी तातडीने मिळाल्यास हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल, असे वनमंत्री संजय राठोड म्हणाले. मानव आणि वन्यप्राणी यातील संघर्ष कमी करण्याला वनखात्याने प्राधान्य दिले आहे, असे वनखात्याचे सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले.  प्रास्ताविक एन. वासुदेवन यांनी केले.

विदर्भाबाबत वाघासारखाच विशाल दृष्टिकोन

उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री तसेच आमदार, खासदारांनी भारतीय सफारी के ली. यादरम्यान त्यांना बिबट, अस्वलाच्या पिलांनी दर्शन दिले.  ‘राजकु मार’ या रुबाबदार वाघाने  लक्ष वेधून घेतले. या वाघाला पाहताच, माणसाचा स्वभाव वाघासारखा विशाल असावा. विदर्भाच्या विकासाबाबत असाच विशाल दृष्टिकोन सरकारचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2021 2:09 am

Web Title: singapore style international park in the sub capital chief minister uddhav thackeray akp 94
Next Stories
1 गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील बंधारे बांधकामात गैरव्यवहार
2 मुख्यमंत्र्यांची ‘ती’ घोषणा असंतोष शमविण्यासाठीच?
3 बाल लैंगिक अत्याचारावरील वादग्रस्त आदेशाला स्थगिती
Just Now!
X