20 January 2021

News Flash

अभियांत्रिकीच्या जागांमध्ये सहा लाखांनी घट

गेल्या पाच वर्षांत देशातील अभियांत्रिकीच्या सहा लाखांवर जागा घटल्याचे वास्तव समोर आले आहे

(संग्रहित छायाचित्र)

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याने गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीला वाईट दिवस आले आहेत. गेल्या पाच वर्षांत देशातील अभियांत्रिकीच्या सहा लाखांवर जागा घटल्याचे वास्तव समोर आले आहे.

स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर सुरुवातीला देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पीक आले. प्रवेशासाठी चक्क रांगा लागायच्या. नोकरीची हमी आणि अभियंत्यांना असलेली प्रतिष्ठा बघून अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळायचे. मात्र, गेल्या पाच वर्षांत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही अनेक विद्यार्थी बँक, स्पर्धा परीक्षा व अन्य नोकरीचा पर्याय निवडत आहेत. अभियांत्रिकी पदवीच्या भरवशावर नोकरी मिळवणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम प्रवेशावर झाल्याने महाविद्यालयांनी गेल्या पाच वर्षांत  जागा कमी करण्याचे ठरवले. यातूनच २०२०-२१ या वर्षांपर्यंत अभियांत्रिकी शाखेतील ६ लाख ५५ हजार ३९६ जागा घटल्या आहेत. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी देशातील तीस लाखांवर असलेल्या जागा थेट २४ लाखांवर आलेल्या आहेत.

वर्ष   अभियांत्रिकीच्या

घटलेल्या जागा

२०१५-१६ ३०,९३,४२६

२०१६-१७ २९,९९,१३८

२०१७-१८ २५,७०,६८८

२०१८-१९ २७,११,८७८

२०१९-२० २५,४१,१५२

२०२०-२१ २४,४०,०३०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 12:20 am

Web Title: six lakh reduction in engineering seats abn 97
Next Stories
1 ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या तिन्ही पर्वात उपराजधानीतील उद्योगक्षेत्राचा हिरमोड
2 समितीअभावी राज्यभरातील वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित
3 प्रशिक्षणासाठी ओबीसी उमेदवारांची वानवा
Just Now!
X