20 September 2020

News Flash

देखभाल दुरुस्तीअभावी सौर ऊर्जा संयंत्र भंगारात

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी तालुक्यातील अनेक ठिकाणचे सौर ऊर्जा संयंत्र निकामी

(संग्रहित छायाचित्र)

मागील सरकारने मोठा गाजावाजा करून व कोटय़वधी रुपये खर्च करून सौर ऊर्जाप्रकल्प उभारले. परंतु चार वर्षांत ते कूचकामी झाले असून देखभाल दुरुस्ती कंपनी पळून गेली आहे. परिणामी, राज्यात अनेक ठिकाणी सौर ऊर्जेची उपकरणे आणि यंत्रसामुग्री भंगार झाली आहे.

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी तालुक्यातील अनेक ठिकाणचे सौर ऊर्जा संयंत्र निकामी झाले आहेत. या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ४५ युनिट सौर ऊर्जा संयत्र बसवण्यात आले आहे. तसेच नागपूर जिल्ह्य़ातील इतर तालुक्यात बसवण्यात आले. पण, देखभाल दुरुस्तीअभावी ८० टक्के संयंत्र निर्थक ठरले आहेत. ऊर्जा विकासाची विविध कामे करण्याच्या दृष्टीने सन २०१५-१६ ते सन २०१८-१९ या पाच वर्षांच्या कालावधीत महाऊर्जा आणि महावितरण या दोन संस्थांना डीपीसीतून १९५.८३ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आणि संबंधित संस्थांनी हा निधी खर्चही केला.

महाऊर्जाच्या कामासाठी २०१४-१५ मध्ये डीपीसीतून एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतरच्या वर्षांत मात्र तीन कोटी रुपये महाऊर्जाला मिळाले. यातून जिल्ह्य़ातील प्राथमिक आरोग्य केंद्र तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालये सौर ऊर्जेवर आणण्यासाठी हा निधी खर्च झाला. सन २०१६-१७ मध्ये ४ कोटी २० लाख रुपये उपलब्ध झाले. यातून शासकीय कार्यालयांवर सौर ऊर्जा संयंत्र आस्थापित करण्यात आले. सन २०१७-१८ मध्ये ४ कोटी ५० लाख आणि सन २०१८-१९ मध्ये ४ कोटी ५० लाख निधी डीपीसीतून महाऊर्जाला मिळाला. यातून ग्रामपंचायत अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेवर सौर पंप बसवण्यात आले.

सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने (मेडा) खासगी कंपन्यांशी करार करण्यात आला. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील कामठी तालुक्यात ४५ युनिट आहे. यामध्ये गुमथाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे १० युनिट प्रकल्प आहे. १२ लाख १९ हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु प्रगत अक्षय ऊर्जा, बगदून, पेठमपूर, इंडस्ट्रीयल एरिया, घार, मध्यप्रदेश येथील कंपनी नवीन सरकार येताच बंद पडली. २० सप्टेंबर २०१६ करार झाला. २० डिसेंबर २०१६ ला काम पूर्ण झाले. करारानुसार

सीएमसी मेंटनन्स पाच वर्षांसाठी,  पीव्ही पॅनेल मेंटनन्स ८० टक्के १५ वर्षांकरिता आणि ६० टक्के २५ वर्षांसाठी, असा करार आहे. मात्र देखभाल दुरुस्ती कंपनी काम सोडून पळून गेली आहे. त्यामुळे वर्षभरापासून देखभाल-दुरुस्ती नाही. भूगाव येथील सौर ऊर्जा संयंत्र निकामी आहे. आपत्कालीन उपाय योजना म्हणून असलेली ही यंत्रणा लोकांच्या कामात येत नसेल तर काय उपयोग, असा  सवाल जिल्हा परिषद सदस्य अंवतिका लेकुरवाळे यांनी केला आहे.

राज्यात जेथे कुठे देखभाल दुरुस्तीअभावी सौर ऊर्जा संयत्र बंद आहेत,  त्या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार कंपनीकडून काम करवून घेण्यात येईल.

– डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:00 am

Web Title: solar power plant scrap due to lack of maintenance repairs abn 97
Next Stories
1 Coronavirus: नागपुरात जनता कर्फ्यू जाहीर, कठोर अमलबजावणीचे आदेश
2 केवळ ६,३२१ चाचण्या; तरीही १,९५७ बाधित
3 यूपीएससी परीक्षार्थीच्या नियोजनाबाबत एसटी विभाग संभ्रमात
Just Now!
X