महापालिकेकडून प्रस्ताव तयार

पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन त्या ठिकाणाहून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी व या प्रकल्पासाठी आवश्यक वीज सौर ऊर्जेतून मिळावी, यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव तयारकरण्यात आला आहे. मात्र, जागेच्या अभावामुळे हा प्रकल्प तलावातच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून देशातील हा पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे.

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
13 Development Centers along Konkan Expressway, Sea Route
कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे; १०५ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
Pune, ring Road Project, farmers, financial complaint, Land Acquisition, Collector Issues Warning, government Officers,
पुणे : ‘रिंगरोडचे भूसंपादन करताना तक्रारी आल्यास…’ जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

या प्रकल्पाबाबत महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या उपस्थित पॉवरग्रीडचे संचालक आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. गोरेवाडा तलावावर ३ मेगावॅट ‘फ्लोटिंग सोलर’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पावरग्रीडने महापालिकेसमोर ठेवल्यानंतर या प्रकल्पाचे सादरीकरण पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत किती, मनपा किती रक्कम या प्रकल्पात गुंतवणार आहे, कर्ज किती उपलब्ध करण्यात येईल, प्रकल्पाचा खर्च किती वर्षांत निघेल आणि किती वर्षे मोफत वीज मिळेल, याबाबत संपूर्ण माहिती या सादरीकरणात देण्यात आली.

याबाबतच्या सर्व शक्यता तपासून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांना दिले. अशा पद्धतीचा प्रकल्प यापूर्वी गुजरातमध्ये उभारण्यात आला असून त्याच धर्तीवर तो नागपुरात उभारण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, उपअभियंता दीपक चिटणीस, पावरग्रीडचे कार्यकारी संचालक संजय गर्ग, व्यवस्थापक अनुराग श्रीवास्तव, उपव्यवस्थापक डॉ. विनय सेनरे उपस्थित होते.