प्रवाशांची तपासणी करताना विषाणूची बाधा होण्याचा धोका

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. विषाणूपासून डॉक्टरांना वाचवण्यासाठी पर्सनल प्रॉटेक्शन किट आवश्यक आहे. परंतु काहींना ती मिळत असून काहींना ती दिली जात नसल्याने ती देण्यातही भेदभाव होत असल्याचे चित्र आहे.

विमानतळावर विलंबानेच का होईना ६ मार्च २०१९ पासून विदेशातून येणाऱ्या  प्रवाशांची स्क्रिनिंग सुरू झाली. ती करणाऱ्या डॉक्टरांना पर्सनल प्रॉटेक्शन किट घालूनच स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. सुरुवातीला आरोग्य विभागाने या डॉक्टरांना साधे मास्क व हातमोजेच दिल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. त्यानंतर येथे स्क्रिनिंग करणाऱ्या डॉक्टरांना ही किट उपलब्ध करण्यात आली.

विमानतळावर रोज आखाती देशातून मध्यरात्रीनंतर दोन विमाने येतात. त्यासाठी  येथे रोज दोन ते तीन डॉक्टर, के अर रुग्णालयातील एक तंत्रज्ञ अशी वैद्यकीय चमू असते. परंतु एकू ण डॉक्टरांपैकी कधी एक तर कधी दोन डॉक्टरांना ही किटच मिळत नाही. त्यामुळे काही डॉक्टर आताही  मास्क व हातमोजे घालून स्क्रिनिंग करतांना दिसतात. या विषयावर आरोग्य उपसंचालकांशी भ्रमनध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न के ला असता प्रतिसाद मिळाला नाही.

विमानतळावर जाण्याकरिता डॉक्टरांसाठी वाहन नाही

नागपुरात मध्यरात्रीनंतरच विदेशातून विमाने येत असल्याने डॉक्टरांना विमानतळावर पोहोचवण्यासाठी प्रशासनाने शासकीय वाहनाची सोय केलेली नाही. या चमूतील एकूण १४ डॉक्टरांमध्ये दोन महिला आहेत.त्यांना मध्यरात्री दुचाकीवर जावे लागते. मानसिक ताणात असा प्रवास अपघाताला निमंत्रण ठरू शकतो.

स्क्रिनिंग करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना विमानतळ प्रशासनाने जागा उपलब्ध के ली आहे. इतर साधनांसह डॉक्टरांना विमानतळावर आणण्यासाठी वाहने उपलब्ध करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. मागणी के लेल्या कर्मचाऱ्यांना  पर्सनल प्रोटेक्शन किट उपलब्ध के ली जाते.

– आबीद रुही, वरिष्ठ संचालक, नागपूर विमानतळ.

प्रशासनाकडून विमानतळावर स्क्रिनिंग करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना मागणीनुसार किट उपलब्ध के ली जात आहे. कु णाला मिळाली नसल्यास ती उपलब्ध के ली जाईल.  डॉक्टरांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

– डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक.