टाळेबंदीमुळे रेल्वेगाडय़ांचे प्रमाण कमी झाल्याने मध्य रेल्वेने सह्य़ाद्री पर्वतरांगेतील घाटांमधील रेल्वेमार्गावरील दरड काढण्याची मोहीम हाती घेतली आणि ६० दिवसांत तीन वाघीण मलबा काढण्यात आला.

मध्य रेल्वेच्या भोर घाट (कर्जत आणि खंडाळा दरम्यान) आणि थल घाटातील (कसारा आणि इगतपुरी दरम्यान) हिल गँग  त्यांच्या रॉक क्लाइंबिंग आणि माउंटन रॅपलिंगद्वारे रेल्वे संरक्षेतील अत्यंत आव्हानात्मक कार्य करीत आहे.  हे सुरक्षा सैनिक, पुणे आणि भारताच्या दक्षिण भागांकडे तसेच नाशिक व भारताच्या उत्तर भागांकडे जाणाऱ्या गाडय़ांना सुरळीत व सुरक्षित रेल्वेमार्ग सुनिश्चित होण्यासाठी वर्षभर  काम करतात.  हे हिल गँगचे सदस्य डोंगरावर रॅपेलिंगमधील कौशल्याच्या माध्यमातून, रुळांवर पडण्याची शक्यता असलेल्या सैल व धोकादायक दरडी  काढून टाकतात. भूस्खलन होण्याची शक्यता असलेला चिखल साफ करतात. पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळे  दूर करणे इत्यादी कामे करतात. यामुळे पावसाळ्यातील रेल्वेच्या अघटित घटना टाळतात.

रोज ४ ते ५ तासांचा  ‘ब्लॉक’

हिल गँगचे सदस्य दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत रुळांशेजारील उंच आणि उभ्या डोंगरांवर चढतात आणि रॅपेलिंगद्वारे सैल आणि असुरक्षित दरडी  शोधून काढतात आणि लाल रंगाने ते चिन्हांकित करतात. त्यानंतर, एप्रिल आणि मे महिन्यात ते दररोज ४ ते ५ तासांचा ब्लॉक घेऊन असे चिन्हांकित सैल झालेले आणि असुरक्षित दरड पाडतात. यावर्षी केवळ भोर घाट आणि थल घाटात ६५० हून अधिक धोकादायक दरडी शोधण्यात आल्यात. दरड ३ वॅगनच्या दरडी विशेष रेल्वेने दररोज ४ ते ५ तासांचा ब्लॉक घेत ६० दिवसांत साफ केले.