करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जि.प.चे नियोजन

नागपूर : करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा परिषदेतर्फे  तालुका पातळीवरील कोविड केंद्रात सुविधा वाढवून तेथे लहान मुलांसाठी खाटा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी जिल्हा परिषदेने सर्व १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर (सीसीसी) व लहान मुलांकरिता चाईल्ड कोविड केअर सेंटर करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु शासनाने तो नामंजूर के ला होता. करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी जिल्ह्य़ात तेराही तालुक्यात कोविड  केअर  सेंटर सुरू करण्यात आले होते.

दुसऱ्या लाटेतही ही व्यवस्था होती. तरीही तेथे सुविधा नसल्याने तेथील रुग्ण मेयो, मेडिकल किंवा खासगी दवाखान्यात उपचारासाठी येत होते. त्यानंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली व त्यात लहान मुले अधिक बाधित होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर  जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येकी तेरा प्राथमिक आरोग्य के ंद्रात  प्रत्येकी दहा खाटांचे  विशेष वार्ड उभारण्याचे नियोजन केले. यासाठी लागणारे वैद्यकीय उपकरणे, औषध, मनुष्यबळ आदींचा जवळपास सात कोटी खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला.

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले  तालुकास्तरावरील कोविड केंद्रात लहान मुलांकरिता ५ ते १५ खाटा राखीव ठेवण्याचे शासनाच्या सूचना आहेत. याशिवाय येथे प्रत्येक सीसीसीत जवळपास ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचीही व्यवस्था राहणार आहे.