22 February 2020

News Flash

जास्त वेळ उभे राहणाऱ्यांना मूळव्याधीचा सर्वाधिक धोका

बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तीला मूळव्याधीचा धोका जास्त असल्याचे सर्वश्रूत आहे,

नागपुरातील २ हजार रुग्णांवरील अभ्यास

बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तीला मूळव्याधीचा धोका जास्त असल्याचे सर्वश्रूत आहे, परंतु शहरात पेट्रोलपंपावरील कर्मचारी, कामगार, शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी, सेवेवरील कर्मचाऱ्यांवर झालेल्या एका अभ्यासात जास्त वेळ उभे राहणाऱ्यांत सर्वाधिक मूळव्याधीचा त्रास असल्याचे पुढे आले आहे. हा अभ्यास गेल्या आठ वर्षांत शहरातील २,००० व्यक्तींमध्ये झाला आहे. यापूर्वीही डॉ. प्रवीण सहावे यांनी वर्ष २००९ मध्ये केलेल्या संशोधनातही ही बाब स्पष्ट झाली असून हा प्रबंध नॅशनल जनरल ऑफ आयुर्वेद सायन्समध्ये प्रसिद्ध झाला आहे.

खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी, जंकफूडचा वाढता वापर, व्यायाम न करणे, कमी होणारे श्रम, वाढत्या बैठी जीवनशैलीसह इतर अनेक कारणांमुळे देशात मूळव्याधीचा आजार वाढत असून सुमारे ५० टक्के नागरिकांना हा आजार होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात हे रुग्ण जास्त असून आजार असलेल्यांमध्ये महिलांचीच संख्या जास्त आहे. मासिक पाळीसह गर्भवती झाल्यावर महिलांमध्ये येणारे हार्मोनल बदल हे या गटात आजार वाढण्याला कारणीभूत आहेत.

जास्त वेळ उभे राहणे व बसणाऱ्यांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात श्रम कमी आहे. तेव्हा शहरी भागातील खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे हा आजार येथेच जास्त आहे.

लठ्ठपणा असलेल्यांमध्येही मूळव्याधीचे प्रमाण सडपातळ व्यक्तींच्या तुलनेत जास्त आहे. वारंवार लघवी व खोकल्यासह इतर त्रास असलेल्या व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता जास्त राहते. आजच्या धकाधकीच्या जीवनात सतत प्रवास, वेळी-अवेळी जेवण व पचनास जड पदार्थ खाण्यामुळे मूळव्याध होण्याचे प्रमाण जास्त असते. डॉ. प्रवीण सहावे यांनी सन २००९ ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयासह नागपूरच्या अभ्युदय पाईल्स हॉस्पिटलमध्ये मूळव्याधीच्या त्रासाकरिता आलेल्या २००० व्यक्तींचा अभ्यास केला.

अभ्यासात तब्बल ६० टक्के रुग्ण हे पेट्रोलपंप वा जास्त वेळ उभे राहून काम करणारे असल्याचे पुढे आले. सन २००९ मध्येही डॉ. सहावे यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील ४० रुग्णांवरील केलेल्या संशोधनात्मक अभ्यासात उभे राहणाऱ्यांत हा आजार जास्त आढळला होता. ते संशोधन नॅशनल जनरल ऑफ आयुर्वेद सायन्स आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या जनरलमध्येही प्रसिद्ध करण्यात आले होते, हे विशेष.

जीवनशैली सुधारा, आजार टाळा

बदलत्या जीवनशैलीमुळे ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात मूळव्याधीचे प्रमाण जास्त आहे. अभ्यासात जास्त बसणाऱ्यांसह उभे राहणाऱ्यांतही हा आजार जास्त आढळला आहे. हा आजार टाळण्याकरिता नित्याने व्यायाम, खानपानाच्या सवयींमध्ये बदल, जास्त उभे राहून काम करणाऱ्यांनी अधूनमधून ब्रेक घेऊन काही वेळ बसणे, खाण्यात सलादचा वापर जास्त करणे, कमोड वापरताना पायाखाली विशिष्ट उंचीचा स्टुल घेणे, शौचाच्या सवयीत बदल करणे, व्यसन टाळणे गरजेचे आहे.

डॉ. प्रवीण सहावे, अभ्युदय पाईल्स हॉस्पिटल, नागपूर

आजाराची कारणे

जन्मजात गुदभागातील नसा सैल असणे

खूप वेळ उभे राहणे

मलबद्धता

गर्भावस्थेत गर्भाशयाचे  वजन वाढणे

खूप तिखट, मसालेदार  मांसाहार घेणे

शौचास चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या शैलीसह इतर

अभ्यासातील निष्कर्ष

(दोन हजार नागरिकांतील)

वर्ग                           टक्के

उभे राहणारे                ६०

सेवेवरील कर्मचारी    १५

गृहिणी                      १५

विद्यार्थी                    १०

कामगारांमध्ये          १०

First Published on December 27, 2016 1:01 am

Web Title: standing too much can cause hemorrhoids
Next Stories
1 हिंदू दाम्पत्यांनी किमान दहा मुले जन्माला घालावीत: स्वामी नरेंद्रानंद सरस्वती
2 दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून ओबीसींसह हजारोंचा बौद्ध धम्मात प्रवेश
3 विद्यापीठात महानुभाव अध्यासन केंद्र, तीर्थस्थळांचाही विकास -मुख्यमंत्री