12 August 2020

News Flash

राज्यातील परिवहन विभागाच्या वाहनांना ‘फास्टॅग’चे वावडे!

पथकर नाक्यांवर न थांबता रहदारीसाठी चारचाकी वाहनांना येत्या १५ डिसेंबरपासून ‘फास्टॅग’ स्टिकर्स अनिवार्य केले आहे.

|| महेश बोकडे

वायूवेग पथके पथकर नाक्यावर अडकणार? :- पथकर नाक्यांवर न थांबता रहदारीसाठी चारचाकी वाहनांना येत्या १५ डिसेंबरपासून ‘फास्टॅग’ स्टिकर्स अनिवार्य केले आहे. हा कर माफ असलेल्या वाहनांनाही स्टिकर आवश्यक आहेत. परंतु राज्याच्या परिवहन खात्याने अद्याप हे स्टिकर घेतले नाही. त्यामुळे

१५ डिसेंबरनंतर आरटीओच्या वायूवेग पथकाची वाहने पथकर नाक्यावर न थांबता जाणार की तासंतास रोख कर भरण्याच्या रांगेत अडकणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यभरातील अनधिकृत प्रवासी व माल तसेच इतर अवैध वाहतुकीवर परिवहन खात्याच्या ५० प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नियंत्रण ठेवले जाते. त्यासाठी राज्यभऱ्यात शंभराहून अधिक वायूवेग पथके कार्यरत आहेत. या चमूंसाठीच्या वाहनांसह आरटीओच्या सेवेवरील सर्वच वाहनांना पथकर नाक्यांवरील करात पूर्णपणे सुट होती.

दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून १५ डिसेंबरपासून पथकर नाक्यांवरून न थांबता

जाण्यासाठी फास्टॅग आवश्यक केले आहे.

पथकर पूर्णपणे माफ असलेल्या वाहनांनाही नि:शुल्क संवर्गातील हे स्टिकर बंधनकारक आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला अर्ज करून हे स्टिकर घ्यायचे आहे. परंतु नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अध्यादेशात पथकर माफ असलेल्या संवर्गात परिवहन खात्याच्या वाहनांचा उल्लेखच नाही. त्यामुळे आरटीओच्या वाहनांना पथकर लागणार की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातर दुसरीकडे परिवहन खात्याकडून अद्याप राष्ट्रीय महामार्ग

प्राधिकरण आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला या स्टिकरसाठी विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर आरटीओच्या वायूवेग पथकाची वाहने स्टिकर अभावी पथकर नाक्यातून निघणार कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नियम मोडणाऱ्या वाहनांवरील कारवाई प्रभावित होणार?

महाराष्ट्राला लागून बरीच राज्ये असून तेथून रोज मोठय़ा संख्येने प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स आणि जड वाहतूक करणारी हजारो वाहने ये-जा करतात. यापैकी नियम मोडणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून आरटीओच्या वायूवेग पथकाला कारवाई करावी लागते. फास्टॅगबाबत परिवहन खात्याच्या घोळात ही वाहने पथकर नाक्यांवर अडकून पडल्यास या वाहनांवरील कारवाई प्रभावित होण्याचा धोका आहे.

‘आरटीओ’च्या वायूवेग पथकातील वाहनांना पूर्वी पथकर लागत नव्हता. या वाहनांसाठी ‘फास्टॅग’ स्टिकरबाबत सध्या कारवाई झाली नसली तरी पथकर नाक्यातून १५ डिसेंबरनंतर काही अडचणी उद्भवू नये म्हणून संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून योग्य कार्यवाही केली जाईल. – शेखर चन्न्ो, परिवहन आयुक्त, मुंबई.

 

पथकर माफ असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह संस्थेच्या वाहनांनाही फास्टॅग स्टिकर अनिवार्य आहे. या व्यक्तींच्या कार्यालयाने स्टिकरसाठी संबंधित यंत्रणेकडे लेखी अर्ज भरून द्यायचा असून तो त्यांना उपलब्ध केला जाणार आहे. त्यात काही त्रुटी असल्यास पुढे दुर होईल. – रमेश गोला, तांत्रिक व्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पीआययू- १, नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:58 am

Web Title: state department of transportation vehicles fastag akp 94
Next Stories
1 वाघांच्या व्यवस्थापनात नवीन क्षेत्रांचाही विचार आवश्यक
2 मदतीच्या निकषाचा शेतकऱ्यांना फटका बसणार
3 शेतकरीपुत्र ते विधानसभा अध्यक्ष, पटोलेंचा संघर्षमय प्रवास
Just Now!
X