नागपूर : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपुरातील दक्षिण-पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढण्याचे  संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

महापालिका निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी असताना विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.  या निवडणुकीच्या निमित्ताने  नाना पटोले यांनी शनिवारी शहरात तीन विधानसभा मतदार संघात आढावा बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दक्षिण-पश्चिम मतदार संघात कार्यकत्र्याशी संवाद साधताना पटोले म्हणाले, फडणवीस यांना शह देण्यासाठी पक्षाने आदेश दिला तर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढण्यास मी तयार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी  पटोले यांनी जोर लावला आहे. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, काँग्रेस स्वबळावर लढणार  आहे.  स्वतङ्मचा पक्ष वाढवणे काही गैर नाही.