News Flash

परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांची तप्त उन्हामुळे गैरसोय

शहरात उष्माघात कृती आराखडा राबवला जात असला तरी परिक्षा केंद्रावर काहीच सोय नाही.

अमरावती येथील एका परीक्षा केंद्रावर भर उन्हात दुपारी बारा वाजता उभे असलेले विद्यार्थी

अनेक परीक्षा केंद्रांवर सुविधांचा अभाव

नागपूर : तप्त उन्हाचे चटके फक्त चाकरमान्यांनाच नाही तर विद्यार्थ्यांना देखील तितकेच सोसावे लागत आहेत. पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा एप्रिलच्या मध्यान्हापासून सुरू होऊन कित्येकदा जूनच्या पूर्वार्धापर्यंत चालतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात उष्माघात कृती आराखडा राबवला जात असला तरी परिक्षा केंद्रावर काहीच सोय नाही. यावर्षी नागपूर विद्यापीठाने या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे विद्यार्थ्यांना आश्वस्त केले आहे, पण अमरावती परीक्षा केंद्रावर अशा काहीच सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे.

अलीकडे विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत सतत गुंतून राहतात. यंदाही तसेच चित्र आहे. जानेवारीत जेईईची परीक्षा, फेब्रुवारीत बारावीची परीक्षा, एप्रिलमध्ये एनडीएची परीक्षा, मे महिन्यात नीट  आणि एमएच-सीईटी अशा रांगेने परीक्षा सुरू आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी दीड तास आधी परीक्षा केंद्रावर नोंदणी, त्यानंतर  केंद्रात प्रवेश आणि नंतर सलग पाच तास एकाच जागेवर बसून संगणकावर प्रश्नपत्रिका सोडवायच्या. समजा या विद्यार्थ्यांने  केंद्रात १२.३० ला प्रवेश केला असेल तर तो सायंकाळी सात वाजताच केंद्राबाहेर पडेल. यादरम्यान त्याला कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत.

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना हा परीक्षांचा भार सहन करावा लागत आहे. पाच ते सात तास एकाच ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान चहा-नाश्त्यांची तरी सुविधा करायला हवी. एरवी मानवाधिकारासाठी भांडणारी मंडळी या विद्यार्थ्यांच्या मानवाधिकाराची गोष्ट करत नाही. स्वत:ला शिक्षणतज्ज्ञ म्हणवून घेणारी सर्व मंडळी देखील गप्प आहेत. खर तर इतक्या परीक्षा हव्यात कशाला, हा खरा प्रश्न आहे.

-अनिल शेंडगे, यवतमाळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 3:59 am

Web Title: students face lack of facilities at many examination centers
Next Stories
1 पत्नीला भेटायला निघाला, अन् तुरुंगात पोहोचला!
2 फिनाईल प्यायल्याने मनोरुग्णाचा मृत्यू!
3 वैद्यकीय प्रवेशासाठी सर्व जिल्ह्य़ांत सेतू!
Just Now!
X