विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग

महिलांनीच महिलांच्या रोजगाराची आणि प्रवासाची काळजी घेणारी व्यवस्था निर्माण केल्यास महिलांच्या सुरक्षितेबरोबरच त्यांच्या रोजगाराच्या संधीही वाढून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकता येईल, असे एक मॉडेल विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी तयार करून त्याचे पोस्टर सादरीकरण केले.

सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाच्या (पीटीए) अहवालानुसार ६० टक्के ग्रामीण आणि शहरी महिला ऑटोरिक्षा, टॅक्सी,  रेल्वे, बस आणि सायकल रिक्षाने प्रवास करतात. मात्र, तरीही छेडछाड, विनयभंग आणि शाळकरी मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना पाहता नोकरदार महिलांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत टक्का वाढवून महिला व मुलीच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांनीच स्वीकारल्यास परिस्थितीत सकारात्मक बदल होऊ शकतो. या दृष्टीने विद्यार्थ्यांनी हे मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल कार्यान्वित झाल्यास महिलांना रोजगार, प्रशिक्षण, रात्री काम करण्याच्या संधींबरोबरच सुरक्षित वातावरण पुरवू शकते, असा विश्वास दीपिका चव्हाण आणि नवेद शेख या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

पीटीईच्या आकडेवारीनुसार ५० टक्के महिला देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये विविध काम करतात.  २५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात फार कमी महिला आहेत. भोपाळ शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्राशी नागपूरशी तुलना केल्यास फक्त तीन ते आठ टक्के महिलाच या क्षेत्रात आहेत.