या आधीही अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर : प्रेमभंग झाल्यानंतर नैराश्यातून एका तरुणीने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री ऊर्फ पल्लवी देशमुख (२९), गणेशपेठ असे मृत तरुणीचे नाव आहे.
पल्लवी गेल्या चार वर्षांपासून प्रेमात होती. अचानक त्यांच्यात मतभेद निर्माण झाले व दोघेही दूर झाले. तेव्हापासून ती नैराश्यात होती. कुटुंबीय तिची देखभाल करीत होते. मात्र तिला जीवन नकोसे झाले होते. यापूर्वी तिने चार ते पाच वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र पोलीस, नातेवाईक आणि तलाव रक्षक जगदीश खरे यांच्या प्रयत्नामुळे तिचा जीव वाचला होता. बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पल्लवी घराबाहेर पडली. गांधीसागर तलावाजवळ पोहचली.
कुणीही बघत नसल्याचा अंदाज घेऊन तलावात उडी घेतली. रात्री बारा वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह जगदीश खरे यांना तरंगताना दिसला. त्यांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. गणेशपेठ पोलिसांना याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2020 12:38 am