26 January 2021

News Flash

‘त्या’ तरुणीची पॉलिग्राफ चाचणी करणार

लॉजमधील संशयास्पद मृत्यू प्रकरण

(संग्रहित छायाचित्र)

खापरखेडा येथील एका लॉजमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत प्रियकराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला अटक केली असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर आरोपी प्रेयसीची पॉलीग्राफ चाचणी करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

जियाउद्दीन (२७, रा. टेकानाका) असे मृताचे तर मेहजबीन (२६, रा. टेका) असे अटकेतील प्रेयसीचे नाव आहे. जियाउद्दीन हा विवाहित असून १५ दिवसांपूर्वीच त्याला मुलगा झाला. लग्नानंतरही त्याचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचीही माहिती आहे. गुरुवारी दोघे खापरखेडय़ातील दहेगाव रंगारी येथील महाराजा लॉज येथे गेले. खोलीत गेल्यानंतर दोघांनी अश्लील चित्रफित बघून तसा प्रणय करण्यासाठी मेहजबीनने जियाउद्दीनला प्रोत्साहित केले. तिने नग्नअवस्थेत जियाद्दीनला लाकडी खुर्चीवर बसवले. त्याचे हातपाय व गळ्याला दोरी बांधली. नग्नावस्थेत त्याचे छायाचित्र काढले. प्रणय केल्यावर मेहजबीन स्नानगृहात गेली. याचदरम्यान खुर्चीवरून खाली पडल्याने जियाउद्दीनच्या गळ्याला फास आवळल्या गेला. त्याचा मृत्य झाला.

तरुणी स्नानगृहातून आली. तेव्हा जियाउद्दीन खाली पडलेला होता. तिने त्याला आवाज दिल्यावर त्याने प्रतिसाद दिला नाही.  तरुणीने आरडाओरड केली. खोलीत आल्यावर जियाउद्दीन मृतावस्थेत पडल्याचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी कळवताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान मेहजबीनने जियाउद्दीनचा खून केल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 12:01 am

Web Title: suspicious death case in the lodge young woman will undergo a polygraph test abn 97
Next Stories
1 शिक्षकांनाही करोना विमा कवच लागू
2 शतकाच्या अंतरी उजळली ‘फूलवात’ कवितेची, पण कुणीच ना ‘सांगाती’!
3 शहरात २४ तासांत दोन हत्याकांड
Just Now!
X